‘जागृती’मध्ये व्यसनमुक्ती कार्यक्रम

‘जागृती’मध्ये व्यसनमुक्ती कार्यक्रम
Published on

56541
गडहिंग्लज : जागृती हायस्कूलमध्ये आयोजित कार्यक्रमात सीमा शिरतोडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

‘जागृती’मध्ये व्यसनमुक्ती कार्यक्रम
गडहिंग्लज : व्यसनमुक्त जीवन हीच प्रभावी देशसेवा आहे. प्रत्येकाने व्यसनापासून दूर राहणे ही काळाची गरज आहे,’ असे प्रतिपादन छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या (सीपीआर) मनोविकृती चिकित्सा विभागाच्या सीमा शिरतोडे यांनी केले. येथील जागृती हायस्कूलमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालय व सीपीआरतर्फे विद्यार्थ्यांसाठी व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम झाला. याप्रसंगी शिरतोडे बोलत होत्या. मुख्याध्यापक उमेश सावंत अध्यक्षस्थानी होते. शिरतोडे म्हणाल्या, ‘‘विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्त जीवन जगणे आवश्यक आहे. व्यसनामुळे व्यक्तीच्या आर्थिक, कौटुंबिक व सामाजिक जीवनावर विपरीत परिणाम होतो. तो टाळायचा असेल तर व्यसनापासून दूर राहा.’’ सचिन मगदूम यांनी स्वागत केले. हर्षल सुभेदार याने विद्यार्थ्यांना नशामुक्तीची सामूहिक शपथ दिली. प्राजक्ता कांबळे यांनी चित्रफितीच्या माध्यमातून अमली पदार्थाच्या दुष्परिणामांची माहिती दिली. उमेश सावंत, उपमुख्याध्यापक अनिल मसाळे, पर्यवेक्षक महंतेश दड्डी यांचीही भाषणे झाली. गीता पाटील यांनी सूत्रसंचालन केले. दशरथ वरोथे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com