स्वप्नांच्या पूर्णत्वासाठी मेहनत हवी

स्वप्नांच्या पूर्णत्वासाठी मेहनत हवी
Published on

56855
भडगाव : डॉ. शिंदे इंजिनिअरिंगमध्ये जिज्ञासा मासिक प्रकाशनप्रसंगी उर्मिलादेवी शिंदे, स्वाती कोरी, महेश कोरी, डॉ. डी. व्ही. घेवडे आदी उपस्थित होते.

स्वप्नांच्या पूर्णत्वासाठी मेहनत हवी
राहुल पाटील : शिंदे इंजिनिअरिंगमध्ये कार्यक्रम उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १२ : परिस्थिती कोणतीही असो, विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत आणि ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने मेहनत करावी. यश एका दिवसात मिळत नाही; त्यासाठी ज्ञान, कौशल्य, चिकाटी आणि योग्य मार्गदर्शन आवश्यक असते, असा संदेश उद्योजक राहुल पाटील यांनी दिला.
भडगाव (ता. गडहिंग्लज) येथील डॉ. ए. डी. शिंदे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये दिनकरराव के. शिंदे स्मारक ट्रस्टतर्फे नवोदित विद्यार्थ्यांसाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ट्रस्टच्या अध्यक्षा उर्मिलादेवी शिंदे होत्या. गुडवन प्रोसेसेस इंजिनिअर्सचे संचालक तथा कॉलेजचे माजी विद्यार्थी राहुल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. ट्रस्टच्या सचिव स्वाती कोरी, सल्लागार महेश कोरी, प्राचार्य डॉ. डी. व्ही. घेवडे, राधाबाई शिंदे कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. एस. एम. कुरबेट्टी व डॉ. ए. डी. शिंदे टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉ. एस. वाय. कुंभार आदी उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. घेवडे यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच मूलभूत विषयांचे ज्ञान भक्कम करण्याचे आवाहन केले. सचिव कोरी यांनी शिंदे स्मारक ट्रस्टच्या वाटचालीचा आढावा घेऊन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःचे भविष्य घडविण्याचे आवाहन केले. शून्यातून सुरू केलेला व्यवसाय आज १२ कोटी रुपयांचा झाल्याचा प्रेरणादायी प्रवास राहुल पाटील यांनी विद्यार्थ्यांसमोर उलगडला. महाविद्यालयाच्या ‘जिज्ञासा’ या मासिकाचे प्रकाशन झाले. उर्मिलादेवी शिंदे यांचेही भाषण झाले. उपप्राचार्य प्रा. के. एस. जोशी यांनी स्वागत केले. प्रा. एस. टी. दुंडगे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रा. एस. व्ही. चव्हाण आणि प्रा. एस. ए. किल्लेदार यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. कल्याणी खंडाळे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com