

58271
इचलकरंजी ः शहरातील ‘अ’ विभागाच्या प्रभाग समिती स्थलांतरित कार्यालयाचे उद्घाटन करताना खासदार धैर्यशील माने, आमदार राहुल आवाडे व इतर.
‘अ’ विभाग प्रभाग समितीच्या
स्थलांतरित कार्यालयाचे उद्घाटन
इचलकरंजी, ता. १९ : येथील महापालिकेच्या ‘अ’ विभागाच्या प्रभाग समिती स्थलांतरित कार्यालयाचे शंकरराव पुजारी जलतरण तलाव येथील इमारतीत स्थलांतर केले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन खासदार धैर्यशील माने, आमदार राहुल आवाडे यांच्याहस्ते झाले. पूर्वी हे कार्यालय महात्मा गांधी पुतळ्याजवळील महापालिकेच्या जुन्या इमारतीत सुरू होते. तेथे गैरसोय होत असल्यामुळे या कार्यालयाचे स्थलांतर करण्यात आले. यावेळी माजी आमदार प्रकाश आवाडे, सुरेश हाळवणकर, महापौर उदय धातुंडे, आयुक्त पल्लवी पाटील, स्थायी सभापती सतीश मुळीक उपस्थित होते. यावेळी त्यांनी प्रभाग समिती कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांना तत्पर व दर्जेदार सेवा देण्याच्या दृष्टीने आवश्यक सूचना केल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.