आर्यन, सत्यजित, आराध्या, तनया आदींची बाजी

आर्यन, सत्यजित, आराध्या, तनया आदींची बाजी
Published on

58790, 58793, 58789
कोल्हापूर ः शिवाजी विद्यापीठाच्या सिंथेटिक ट्रॅकवर सुरू असलेल्या जिल्हास्तरीय कनिष्ठ मैदानी स्पर्धेत गोळाफेक स्पर्धेतील क्षण. दुसऱ्या छायाचित्रात लांब उडी स्पर्धेतील क्षण. तिसऱ्या छायाचित्रात उंचउडीतील क्षण.
........................................
आर्यन, सत्यजित, आराध्या, तनया आदींची बाजी

जिल्हास्तरीय कनिष्ठ मैदानी स्पर्धेला प्रारंभ ः ७९० जणांचा सहभाग

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २१ ः जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन व शिवाजी विद्यापीठ यांच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कनिष्ठ गट मैदानी स्पर्धेत आर्यन म्हातुगडे, शेहजाद बागवान, सत्यजित कोळाप्टे, सिद्धनाथ खोत, प्रशांत पुजारी, तर मुलींमध्ये आराध्या महाडिक, तनया किबिले, वैष्णवी घोसरवाडी आदींनी बाजी मारली.
शिवाजी विद्यापीठाच्या सिंथेटिक ट्रॅकवर सुरू असलेल्या या स्पर्धेत १४ ते १८ वर्षांखालील मुला-मुलींमध्ये ७९० खेळाडूंनी सहभाग नोंदविला. स्पर्धेचे उद्‍घाटन डॉ. डी. वाय .पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्रशासकीय अधिकारी सुयोग पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त शहाजी सूर्यवंशी, आर. व्ही. शेटगे, कृष्णात लाड, सतीश पाटील, सचिन पाटील, असोसिएशनचे सचिव प्रा. प्रकुल पाटील-मांगोरे आदी उपस्थित होते.
स्पर्धेचा निकाल असा ः
१४ वर्षांखालील मुले : ट्रायथलॉन ‘ए’मध्ये आर्यन म्हातुगडे, राजवर्धन पाटील, पृथ्वीराज मगदूम यांनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक मिळवले. ट्रायथलॉन ‘बी’मध्ये शेहजाद बागबान, शिवम बुगडे, सुवेद भोसले; तर ट्रायथलॉन ‘सी’मध्ये सत्यजित कोळपाटे, श्रीतेज पाटील, संचित सासुलकर यांनी यश मिळवले. शंभर मीटरमध्ये साई पाटील, प्रभुमन पवार, रेहान सनदी; किड्स जॅव्हेलिनमध्ये यश झाटे, संकेत पाटील, पार्थ काटे आघाडीवर राहिले.
१४ वर्षांखालील मुली : ट्रायथलॉन ‘ए’मध्ये आराध्या महाडिक, गार्गी चौगुले, अश्विनी पोवार; ‘बी’मध्ये तनया किबिले, सिद्धी खोराटे, येसू पाटील; तर ‘सी’मध्ये तनुजा नलवडे, आरोही पाटील, अजमिना तिवले यांनी पहिले तीन क्रमांक मिळवले. शंभर मीटरमध्ये तनया किबिले, राधिका पाटील, अनुष्का पाटील यशस्वी ठरल्या. किड्स जॅव्हेलिनमध्ये वैष्णवी घोसरवाडीने बाजी मारली.
१८ वर्षांखालील मुले : १०० मीटरमध्ये सिद्धनाथ खोत, हर्षवर्धन मिरजकर, दक्ष सावंत; २०० मीटरमध्ये प्रशांत पुजारी, विराज चौगुले, सिद्धनाथ खोत; ४०० मीटरमध्ये अंकुर कुदळे, विराज चौगुले, अनिरुद्ध हाजगूळकर यांनी पहिले तीन क्रमांक मिळवले. १००० मीटरमध्ये रणवीर फराकटे, राजवर्धन फराकटे, प्रथमेश बेलेकर; एकशे अठरा दहा मीटर हार्डल्समध्ये प्रणव एकल, आयुष तिकोडे, आयुष रावडे यांनी यश मिळवले.
उंच उडीमध्ये ः अथर्व सातपुते, तेजस पाटील, रितेश पाटील; लांब उडीमध्ये संस्कार संकपाळ, पौरेश भोई, श्रीरंग गुरव; गोळाफेकमध्ये हर्षवर्धन कोडोलकर, अभिषेक गुरव, गौरव सुतार यांनी क्रमांक मिळवले. थाळीफेकीत प्रथमेश खोत, आयुष पाटील, सक्षम पाटील; भालाफेकमध्ये प्रथमेश कामिरे, सुमित चौगुले, सक्षम पाटील आघाडीवर राहिले.
पाच हजार मीटर रेसवॉकमध्ये अभिषेक लवटे, साई गावडे, कार्तिक पाटोळे; हेप्टॅथलॉनमध्ये हर्षल पाटील, श्रेयश मोरे, क्षितिज खाबडे यांनी यश संपादन केले.
१८ वर्षांखालील मुली : शंभर मीटरमध्ये प्रतीक्षा मुगडे, देविका देसाई, समृद्धी बाबर; दोनशे मीटरमध्ये प्रतीक्षा मुगडे, गायत्री मंडडे, अक्षरा पोटे; चारशे मीटरमध्ये सदिच्छा नागरपोले, अमृता पाटील, श्रेया पाटील यांनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक मिळवले. एक हजार मीटरमध्ये आदिती जाधव, भूमी बेळगावकर, अश्विनी लोहार यांनी यश मिळवले. शंभर मीटर हर्डल्समध्ये हर्षदा चौगुले प्रथम आली. उंच उडीमध्ये जानवी घोडके, धनश्री लिंबाजी; लांब उडीमध्ये जानवी घोडके, तनवी पाटील, धनश्री लिंबाजी यांनी क्रमांक मिळवले.
गोळाफेकमध्ये तपस्या बस्तवडे, स्नेहा पाटील, निर्विका सोहनी; थाळीफेकमध्ये गायत्री पाटील, निर्विका सोहनी, सोनाली जाधव; भालाफेकमध्ये अमृता पाटील, मेहरीन उस्ताद, तुलसी माळी यांनी यश संपादन केले. ५००० मीटर रेसवॉकमध्ये आर्या पाटील प्रथम, तर संचिता पाटीलने द्वितीय क्रमांक पटकावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com