

क्षीरसागर फाउंडेशनतर्फे आज
‘श्रावण व्रतवैकल्य’ कार्यक्रम
कोल्हापूर, ता. २३ : श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी (ता. २४) ‘श्रावण व्रतवैकल्य’ हा सामुदायिक उपवास सोडण्याच्या कार्यक्रम महावीर गार्डनजवळील नष्टे लॉनमध्ये सायंकाळी सहा वाजता होणार आहे, अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या माजी कोषाध्यक्षा आणि भगिनी मंचच्या अध्यक्षा वैशाली क्षीरसागर यांनी दिली.
क्षीरसागर म्हणाल्या, ‘हिंदुत्ववादी संघटना व आमदार राजेश क्षीरसागर फाउंडेशनतर्फे याचे आयोजन केले आहे. या पार्श्वभूमीवर नियोजान बैठक शनिवार पेठेतील ‘शिवालय’ येथे झाली. श्रावण महिन्यात सोमवारी ‘श्रावण व्रतवैकल्य’ या सामुदायिक उपवास सोडण्याच्या उपक्रमाचे आयोजन गेली १३ वर्षे करण्यात येत आहे.’
यावेळी बाबा वाघापूरकर, यादव महाराज, श्रीकांत पोतनीस, उदय भोसले, किशोर घाटगे, चंद्रकांत बराले, मधुकर नाझरे, निरंजन शिंदे, सुनील सामंत, कमलाकर किलकिले, विक्रम जरग, जी. जी. जोशी, विकास यादव, किरण दुसे, अर्जुन आंबी, पूजा भोर आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.