इचल : आंतर शालेय स्पर्धा

इचल : आंतर शालेय स्पर्धा
Published on

59167
इचलकरंजी ः आंतरशालेय स्पर्धांमध्ये प्राथमिक गटातील सर्वसाधारण विजेत्या अनंतराव भिडे विद्यामंदिरला बक्षीस वितरण करताना मान्यवर.
...................
मराठी मीडियमसह अनंतराव भिडे
विद्यामंदिरला सर्वसाधारण विजेतेपद

आंतरशालेय स्पर्धा ः तीन हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. २३ ः येथील नामदेव समाजसेवा मंडळाच्या वतीने आयोजित श्री संत नामदेव महाराज समाधी महोत्सवानिमित्त आयोजित आंतरशालेय स्पर्धांमध्ये प्राथमिक गटात डीकेटीई संस्थेचे अनंतराव भिडे विद्यामंदिर (मराठी माध्यम), तर माध्यमिक गटात मराठी मीडियम हायस्कूल (नारायण मळा) यांनी सर्वसाधारण विजेतेपद पटकावले.
संत नामदेव भवन येथे चित्रकला, सामान्यज्ञान, बुद्धिबळ, निबंध, वक्तृत्व, पाठांतर, गायन व वेशभूषा आदी स्पर्धांचे आयोजन केले होते. शहर व परिसरातील सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांनी स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. वैयक्तिक व सर्वसाधारण पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात झाला.
मुंबई उच्च न्यायालयाचे वकील विश्वनाथ टाळकुटे यांच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते श्री संत नामदेव महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी संदीप कल्याणकर, अनंतराव कुडाळकर, उमाकांत कोळेकर आदी उपस्थित होते.अध्यक्ष राजन उरुणकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रा. अनिल अवसरे यांनी स्पर्धेचा अहवाल सादर केला. सीमा उरुणकर यांनी सूत्रसंचालन केले. योगेश पाटुकले यांनी आभार मानले.

Marathi News Esakal
www.esakal.com