गड- एसटी क्रॉकटीकरण शुभारंभ

गड- एसटी क्रॉकटीकरण शुभारंभ
Published on

60426
गडहिंग्लज : बसस्थानक परिसरातील काँक्रिटीकरणाच्या कामाचा प्रारंभ हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी प्रकाश पताडे, सतीश पाटील, डॉ. प्रतिभा चव्हाण, वृषाली भोसले, महेश सलवादे आदी.

--
जि. प. सदस्यांचा सन्मान राखला जाईल
हसन मुश्रीफ : गडहिंग्लज बसस्थानक काँक्रिटीकरण, पॅव्हेलियनचा प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २९ : ‘शहराच्या विकासाबरोबरच ग्रामीण भागाचा विकासही महत्त्वाचा आहे. विकास निधीबाबत आमदार, खासदार आणि जिल्हा परिषद सदस्यांत मतभिन्नता आहे. पण, यात जिल्हा परिषद सदस्यांचा योग्य तो सन्मान राखला जाईल. लवकरच याबाबत समन्वयाने तोडगा काढला जाईल,’ असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
येथील बसस्थानक परिसर काँक्रिटीकरण आणि वडरगे मार्गावरील जिल्हा परिषद क्रीडा संकुल पॅव्हेलियन बांधकामाचा प्रारंभ झाला. याप्रसंगी श्री. मुश्रीफ बोलत होते. जिल्हा परिषद सदस्या शैलजा पाटील यांनी निवडणूक होऊन सहा महिने उलटले तरी निधी नसल्याने लोक विकासकामाबाबत विचारणा करत असल्याचा उल्लेख भाषणात केला. हाच धागा पकडत श्री. मुश्रीफ यांनी वरील खुलासा केला.
श्री मुश्रीफ म्हणाले, ‘गडहिंग्लज हे या विभागातील महत्त्वाचे आगार असल्याने सुविधांसाठी प्राधान्य दिले आहे. राज्य शासनाने महिला, ज्येष्ठ नागरिक यांच्या प्रवासातील सवलतीचे पैसे तातडीने देणे सुरू केल्याने कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न निकाली निघत आहे. एसटी ही सर्वसामान्यांच्या प्रवासासाठी हक्काचे साधन आहे.’
एसटीच्या विभागीय नियत्रंक वृषाली भोसले यांनी स्वागत केले. प्रभारी नगराध्यक्ष महेश सलवादे, सभापती डॉ. प्रतिभा चव्हाण, महेश तुरबतमठ यांचीही भाषणे झाली. गोडसाखरचे अध्यक्ष प्रकाश पताडे, जिल्हा परिषद सदस्य अमर चव्हाण, सतीश पाटील, अनंत कुलकर्णी आदी उपस्थित होते. रफिक पटेल यांनी सूत्रसंचालन केले. संकेत जोशी यांनी आभार मानले.

चौकट...
खेळाडूंची होणार सोय...
वडरगे मार्गावरील जिल्हा परिषदेच्या क्रीडा संकुलात पहिल्या टप्प्यातील फुटबॉल मैदान आणि चारशे मीटरचा ट्रॅक पूर्ण झाला आहे. पण, सरावासाठी येणाऱ्या खेळाडूंची चेंजिंग रूम आणि स्वच्छतागृहाअभावी कुचबंना होत होती. त्याबाबत तक्रारी होत्या. दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या नव्या पॅव्हेलियनमधील सोयीमुळे खेळाडूंच्या या तक्रारी दूर होतील. तिसऱ्या टप्प्यात सिंथेटिक ट्रॅक आणि फुटबॉलचे टर्फ मैदान होणार असल्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाषणात सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com