व्यंकाप्पा भोसले लेख

व्यंकाप्पा भोसले लेख
Published on

एन्र्टो
या देशातील भटक्या-विमुक्त समाजाला स्वातंत्र्याचा खरा अर्थ अजूनही शोधावा लागत आहे. या जमातींनी स्वातंत्र्यलढ्यात रक्त सांडले; पण त्यांच्यावरील कलंक आणि उपेक्षेची सावली पूर्णपणे दूर झाली नाही. समान संधी, सन्मान आणि विकासाची प्रतीक्षा आजही कायम आहे.
- दलितमित्र व्यंकाप्पा भोसले

संधी, विकास, सन्मानाची आजही प्रतीक्षाच

हजारो वर्षांपासून आदिवासी व भटक्या विमुक्त जमाती गुलामगिरीतच जीवन जगतात. या जमाती जंगलात आणि शहराकडे आल्यावर गाव कुसाबाहेर राहणाऱ्या. जंगलच त्यांचे सर्वस्व होते. आजही त्यांचा जंगलाशी संबंध आहे. जंगलात राहिल्यामुळे शिक्षण झाले नाही. परिणामी त्यांना आपला विकास करता आला नाही. भारतात आलेल्या ब्रिटिशांनी संपत्ती लुटली, जंगलांचा ऱ्हास केला, त्यामुळे जमातीचा उदरनिर्वाह कमी झाला. पोरा-बाळांसाठी शहर आणि गाव गाड्यात यावे लागले. जगण्यासाठी त्यांनी गावातला व्यवसाय, धंदा, संस्कृती त्यासाठीची भाषा शिकून घेतली आणि ते जगू लागले.
जंगलतोडीमुळे ब्रिटिश शासनावर त्यांचा राग होता. स्वातंत्र्यासाठी १८५७ मध्ये संघर्ष सुरू होता. त्यात आदिवासी भटके सहभागी झाले. ही माणसे फार लढावू, पराक्रमी, धाडसी वृत्तीची. गावात मात्र या जमातींबद्दल सनातनी माणसांमध्ये फार असुया होती. संघर्षात भटके विमुक्त पुढे होते म्हणून कपटबुद्धीने या ब्रिटिश शासन आणि सनातनी लोकांनी या मंडळींना दरोडेखोर, चोर ठरवून बदनाम केले. त्यांच्याविरोधात १८७१ मध्ये देशभर संशयित गुन्हेगार कायदा केला. यामुळे त्यांना गावात जायला बंदी होती.
देश स्वतंत्र झाला; पण हे स्वातंत्र्य भटक्या विमुक्त जमातींना मिळाले नाही. स्वातंत्र्य लढ्यात सहभागी असूनही वाट्याला दुय्यम नागरिकत्व आले. सोलापूरला १९५२-५३ मध्ये भटक्या-विमुक्त जमातींनी मोठी परिषद भरवली होती. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू उद्‍घाटनाला आले होते. त्यावेळी त्यांना समजले, की आम्ही पारतंत्र्यात आहोत. नेहरूंनी तातडीने परिषदेमध्ये आम्हाला स्वातंत्र्य बहाल केले व तो दिवस म्हणजे ३१ ऑगस्ट. तो आम्ही आमचा स्वातंत्र्य दिन समजतो.
पण आज देशातली परिस्थिती काय सांगते? ‘सबका साथ, सबका विकास’ म्हणणारे शासन म्हणते, देशाला मोठे व्हायचे असेल तर कुशल कारागीर व्हा. आम्ही भटके तर पिढ्यानपिढ्या कारागीरच. त्यालाच तुम्ही सांगताय, कुशल कारागीर व्हा. आजपर्यंत बलुतेदारी कोण करत होते? गावातली साफसफाई कोण करतात? या कामात उच्चवर्णीय दिसतो का? उच्च पदावर आम्ही कुठे आहोत?, ते एकदा शासनाने जाहीर करावे म्हणजे ‘सबका साथ, सबका विकास’ कोणाचा झालाय ते कळेल. आम्हाला संधी केव्हा मिळणार, ते सांगा. शासन या परिस्थितीचा विचार करणार आहे की नाही?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com