

60550
कोल्हापूर : वाहने तोडफोड प्रकरणी गौरव व लक्ष्मण वडर यांना पोलिसांनी दौलतनगरात फिरविले.
दौलतनगरातील तोडफोडप्रकरणी
सख्ख्या भावांना अटक
घटनास्थळी फिरवले; पाच वाहनांचे केले नुकसान
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३० ः दारूच्या नशेत घरासमोरील वाहनांची तोडफोड करणाऱ्या सख्ख्या भावांना राजारामपुरी पोलिसांनी अटक केली. गौरव ऊर्फ सोन्या संतोष वडर (वय २६) व लक्ष्मण ऊर्फ देवराज संतोष वडर (२०, तीनबत्ती चौक, दौलतनगर) अशी त्यांची नावे आहेत. कुऱ्हाडीचे घाव घालून दोघांनी भागातील पाच वाहनांचे नुकसान केले होते. दोघांची दहशत मोडीत काढण्यासाठी आज घटनास्थळी पोलिसांनी फिरविले.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, संशयित वडर बंधू मेंढपाळ म्हणून काम करतात. त्यांच्या घरासमोर वाहने उभी करण्यावरून काही जणांसोबत पूर्वीचे वाद आहेत. दहशत करण्याच्या प्रयत्नातून गौरव आणि लक्ष्मण यांनी कुऱ्हाड हातात घेऊन भागातील दोन मोटारी, तीन मोटारसायकलींची तोडफोड केली. फिर्यादी सचिन पाटील यांच्यासह पाच जणांचे १ लाखाचे नुकसान झाल्याचा गुन्हा राजारामपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाला होता.
संशयित वडर बंधूंनी यापूर्वीही भागात दहशत करण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिस निरीक्षक विकास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार कृष्णात पाटील, मिलिंद बांगर, विशाल शिरगावकर, सचिन वायदंडे, नितीश बागडी यांनी कामगिरी बजावली.
--
गोकुळ शिरगावमधून ताब्यात
तोडफोडीनंतर दोघेही पसार झाले होते. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोघांचा माग काढण्यात येत होता. पोलिस अंमलदार अमोल पाटील व गजानन हराळे यांना संशयित गोकुळ शिरगावमध्ये लपल्याची माहिती मिळाली. त्यांनी तातडीने पथकासोबत जाऊन दोघांना ताब्यात घेतले.
-
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.