‘संकल्प’तर्फे इचलकरंजीमध्ये ‘ध्यानोत्सव’ उपक्रमाची घोषणा

‘संकल्प’तर्फे इचलकरंजीमध्ये ‘ध्यानोत्सव’ उपक्रमाची घोषणा
Published on

60991
इचलकरंजी ः येथे ध्यानोत्सव उपक्रमाच्या प्रारंभप्रसंगी डाॅ. अमित राठी. यावेळी उपस्थित चंद्रकांत चौगुले, महेश चव्हाण, डाॅ. एस. पी. मर्दा, वैशाली आवाडे, निकिता मुंदडा, रक्षा राव.

‘संकल्प’तर्फे इचलकरंजीमध्ये
‘ध्यानोत्सव’ उपक्रमाची घोषणा
‘वस्त्रनगरी’ला ‘स्वास्थ्य नगरी’ म्हणून ओळख देणार
इचलकरंजी, ता. १ ः वस्त्रोद्योगासाठी देशभर ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजीला आता ‘वस्त्रनगरी’ सोबत ‘स्वास्थ्य नगरी’ म्हणून नवी ओळख मिळवून देण्याचा संकल्प हेल्थी लाइफस्टाईल फाउंडेशनने केला आहे. साधना मंदिरच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात फाउंडेशनचे संस्थापक डॉ. अमित राठी यांनी ‘ध्यानोत्सव’ या शहरव्यापी उपक्रमाची घोषणा केली.
डॉ. राठी यांनी स्वस्थ समाजाच्या निर्मितीसाठी केवळ शारीरिक स्वास्थ्य पुरेसे नसून मानसिक स्वास्थ्यालाही तितकेच महत्त्व देणे आवश्यक असल्याचे नमूद केले. शहरातील नागरिक, शाळा, महाविद्यालये, संस्था, व्यावसायिक समूह आणि विविध सामाजिक घटकांना ध्यानाच्या माध्यमातून जोडण्याचा ‘ध्यानोत्सव’ उपक्रमाचा उद्देश आहे. २१ डिसेंबरला जागतिक ध्यान दिननिमित्त शहरातील मोठ्या सामूहिक ध्यानाच्या अनुभवासाठी सर्वांना एकत्र आणण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
या प्रवासात ‘ध्यान आरंभ, ध्यान यात्रा, ध्यानोत्सव’ अशा टप्प्यांमधून समाजातील विविध घटकांना सहभागी करून घेतले जाणार आहे. साधना मंदिरमध्ये प्रत्येक शनिवारी विविध संस्था व समूह यांना सामूहिक ध्यानाच्या अनुभवाशी जोडण्याची संकल्पनाही यावेळी मांडण्यात आली. यावेळी डॉ. एस. पी. मर्दा, वैशाली आवाडे, उद्योजक गिरीराज मोहता, अशोक ईस्वामी, अशोक केसरकर यांनी मनोगत व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com