उपचारांमुळे प्रत्यारोपण टळले; रुग्णाच्या यकृताचे कार्य पूर्ववत

उपचारांमुळे प्रत्यारोपण टळले; रुग्णाच्या यकृताचे कार्य पूर्ववत
Published on

उपचारांमुळे प्रत्यारोपण टळले;
रुग्णाच्या यकृताचे कार्य पूर्ववत

कार्यक्षमता सुधारण्यात डॉक्टरांना यश

कोल्हापूर, ता. १० : अंतरंग हॉस्पिटलचा प्रतिसाद आणि मुंबईतील अपोलो हॉस्पिटलमधील अत्याधुनिक उपचार व अतिदक्षता सेवेमुळे एका महिला रुग्णावरील यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया टाळून तिच्या यकृताचे कार्य पूर्ववत करण्यात डॉक्टरांना यश आले, अशी माहिती अंतरंग हॉस्पिटलचे संचालक डॉ. विवेकानंद कुलकर्णी, डॉ. आदित्य कुलकर्णी आणि अपोलो हॉस्पिटलच्या प्रत्यारोपण विभागाचे प्रमुख डॉ. गुरुप्रसाद शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, ‘पद्मजा नांद्रे यांना यकृताच्या समस्येमुळे येथील अंतरंग हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. येथे डॉ. आदित्य कुलकर्णी व डॉ. अमेय सोनवणे यांनी तपासण्या व उपचार केले. उपचारातूनही त्यांच्या प्रकृतीत अपेक्षित सुधारणा होत नव्हती. यकृताची कार्यक्षमता झपाट्याने कमी होत असल्याने यकृत प्रत्यारोपणाची गरज असल्याचे डॉक्टरांनी नातेवाइकांना सांगितले.
प्रत्यारोपणासाठी पद्मजा यांना मुंबईतील अपोलो हॉस्पिटलमध्ये पाठवले. तेथे डॉ. शेट्टी यांनी प्रत्यारोपणाची शक्यता लक्षात घेऊन उपचार सुरू केले. पद्मजा यांच्या कन्येने यकृतदानाची तयारी दर्शविली. प्रत्यारोपणाची पूर्वतयारी पूर्ण झाली. तत्पूर्वी पद्मजा यांच्या ताज्या वैद्यकीय अहवालांचा डॉ. शेट्टी यांनी आढावा घेतला यात त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे दिसले. यावेळी ‘प्लाझ्मा एक्सचेंज’ची सत्रेही घेण्यात आली.
डॉ. सुदीप सेन यांनी पद्मजा यांच्या आरोग्याची स्थिरता राखणे, तपासण्या, यकृताची कार्यक्षमता कमी झाल्यामुळे निर्माण होणाऱ्या गुंतागुंती कमी करण्यावर भर दिला. या उपचारातून त्यांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली. परिणामी यकृत प्रत्यारोपण स्थगित करून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्या आला.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com