

केएमटी कर्मचाऱ्यांचे
कामबंद आंदोलन
तात्पुरते स्थगित
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २१ : केएमटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत मंगळवारी (ता. २२) मध्यरात्रीपासून पुकारलेले कामबंद आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याबाबतचे पत्र म्युनिसिपल ट्रान्स्पोर्ट वर्कर्स युनियनतर्फे आयुक्त, उपायुक्त, अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक यांना दिले.
पत्रात म्हटले आहे, केएमटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत मंगळवारी (ता. २२) मध्यरात्रीपासून काम बंद आंदोलन संपावर जाण्याची नोटीस दिली होती. या संदर्भात १५ तारखेला केएमटी प्रशासन आणि परिवहन पदाधिकाऱ्यांबरोबर संघटनेच्या प्रतिनिधींमध्ये सकारात्मक तोडगा काढण्याच्या दृष्टीने चर्चा झाली. पहिली मागणी रोजंदारी कर्मचाऱ्यांना संघटनेच्या करारानुसार आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायद्यानुसार जुलै महिन्याचा फरकासह सप्टेंबर पेडइन ऑगस्ट वाढीव पगार मान्य केले होते. त्याप्रमाणे वाढीव पगार कर्मचाऱ्यांना मिळाला. रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा प्रस्ताव शासन दरबारी आहे. चालक-वाहक १५४ व वर्कशॉपमधील चार असे १५८ कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव ४५ दिवसांत मान्यता घेऊन कायम स्वरूपाचे ऑर्डर देऊ व इतर प्रलंबित मागण्यापण या कालावधीत पूर्ण करण्यास आम्ही बांधिल आहोत, असे सभापती आणि परिवहन समिती सर्व सदस्य, उपायुक्त तथा नियंत्रण अधिकारी कंकाळ, अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक संजय भोसले हे ४५ दिवसांच्या कालावधीत पूर्ण करण्यास बांधिल असल्याचे लेखी प्रोसिडिंग दिले आहे.
त्यांच्या शब्दास मान देऊन उद्याचा (ता. २२) पुकारलेले कामबंद आंदोलन तात्पुरते स्थगित करीत आहोत, मात्र ४५ दिवसांत प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यास दोन ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीपासून कोणतीही पूर्वसूचना न देता म्युनिसिपल ट्रॉन्स्पोर्ट वर्कर्स युनियन काम बंद आंदोलन करेल. तथापि, कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबतची कार्यवाही विहीत कालमर्यादित सुरू करून ती पूर्ण करण्यास संबंधित विभागास ओदश द्यावे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.