

67505
कोल्हापूर : ‘ट्रान्स्फॉर्मिंग इन डिजिटल लायब्ररीज्’ या राष्ट्रीय कार्यशाळेत बोलताना डॉ. विशेश हंचीनाळ.
कॉमर्स कॉलेजमध्ये राष्ट्रीय कार्यशाळा
कोल्हापूर : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात जग वेगाने बदलत असून, या बदलत्या तंत्रज्ञानाशी सुसंगत राहण्यासाठी ग्रंथालयांनीही आपल्या कार्यशैलीत आवश्यक बदल करून आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा,’’ असे प्रतिपादन टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस तुळजापूर कॅम्पसचे सहाय्यक ग्रंथपाल डॉ. विरेश हंचीनाळ यांनी केले.
कॉलेज ऑफ कॉमर्स, एच. टी. अपराध ग्रंथालय, न्यू कॉलेज आणि शिवाजी विद्यापीठ कॉलेज लायब्ररी असोसिएशनतर्फे ‘ट्रान्स्फॉर्मिंग इन डिजिटल लायब्ररीज्’ यावर एकदिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेत ते बोलत होते. कौन्सिल ऑफ एज्युकेशनचे सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम अध्यक्षस्थानी होते. डॉ. मगदूम यांनी व्यक्तीला सतत अद्ययावत ठेवण्यासाठी वाचनाचे महत्त्व अधोरेखित करत ग्रंथालयांची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे नमूद केले. प्राचार्या डॉ. वर्षा मैंदर्गी यांनी प्रास्ताविक केले. पुणे विद्यापीठाचे सहाय्यक ग्रंथपाल राजेंद्र कुंभार यांनी डिजिटल तंत्रज्ञानाचा वाचक, वाचन आणि ग्रंथालयांवर होणाऱ्या परिणामांवर मार्गदर्शन केले. समारोप सत्रात शिवाजी विद्यापीठाच्या बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राचे प्रभारी संचालक डॉ. डी. बी. सुतार, प्रा. डॉ. सचिनकुमार पाटील यांनी मार्गदशन केले. यावेळी निवडक संशोधन पेपरचे सादरीकरण तसेच सहभागी ग्रंथपालांना प्रमाणपत्रांचे वितरण केले.
कौन्सिल ऑफ एज्युकेशनच्या अध्यक्षा रजनीताई मगदूम, उपाध्यक्ष डॉ. प्रसाद मगदूम, सदस्य ॲड. वैभव पेडणेकर, ॲड. अमित बाडकर यांचे मार्गदर्शन लाभले. विविध महाविद्यालयांतील २०० हून अधिक ग्रंथपाल, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.