

49702
डॉ. यशवंतराव थोरात
-
डॉ. यशवंत थोरात यांना
‘दिनकर मास्तर’ पुरस्कार
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १० ः दिनकरराव शिंदे स्मारक ट्रस्ट व कै. श्रीपतराव शिंदे शैक्षणिक संकुलातर्फे दरवर्षी दिला जाणारा ‘दिनकर मास्तर’ पुरस्कार यावर्षी नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉ. यशवंतराव थोरात यांना देण्यात येणार आहे, अशी माहिती ट्रस्टच्या सचिव तथा माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी यांनी दिली. दरम्यान, बुधवारी (ता. १४) सकाळी दहा वाजता या पुरस्काराचे वितरण शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. के. कामत यांच्या हस्ते होणार आहे. भडगाव येथील डॉ. ए. डी. शिंदे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेत कार्यक्रम होईल. संस्थाध्यक्षा उर्मिला श्रीपतराव शिंदे अध्यक्षस्थानी असतील. याचवेळी माजी आमदार ॲड. श्रीपतराव शिंदे यांचा तृतीय स्मृतिदिन साजरा होणार आहे.
सौ. कोरी म्हणाल्या, स्वातंत्र्यपूर्व काळात बहुजन समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे कार्य दिनकरराव शिंदे तथा दिनकर मास्तरांनी केले. गरीब कुटुंबातील मुलांसाठी त्यांनी प्रसंगी मादुकरी मागून त्यांना शिकविले. त्यांचे हे कार्य आजही प्रेरणादायी असून त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी त्यांच्या नावे पुरस्कार दिला जातो. यावर्षी देशातील ग्रामीण अर्थव्यवस्था व सहकारी संस्थांच्या विकासात योगदान दिलेले ज्येष्ठ बॅंकिंग तज्ज्ञ व अर्थशास्त्रज्ञ डॉ. यशवंतराव थोरात यांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. थोरात हे ग्रामीण विकास क्षेत्रातील अनुभवी प्रशासक आहेत. त्यांनी रिझर्व्ह बॅंक व नाबार्ड या महत्त्वपूर्ण वित्तीय संस्थांत वरिष्ठ पदावर काम केले. ते केवळ बॅंकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणूनच नव्हे तर शेती, ग्रामीण विकास, अर्थव्यवस्था, सहकार व वित्तीय धोरणाचे अभ्यासक आहेत..
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.