

70656
कोल्हापूर : ‘क्युरालाईफ कॅन्सर सेंटर’च्या वर्धापन दिनानिमित्त केक कापून आनंद व्यक्त करताना उपस्थित मान्यवर.
‘क्युरालाईफ कॅन्सर सेंटर’चा
वर्धापन दिन उत्साहात
कोल्हापूर : रुग्णकेंद्रित कर्करोग उपचारांसाठी ओळख निर्माण केलेल्या ‘क्युरालाईफ कॅन्सर सेंटर’चा पहिला वर्धापन दिन झाला. यानिमित्त विविध मनोरंजक कार्यक्रम झाले. डॉक्टर, रुग्णालयातील कर्मचारी, लहान मुले आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी सहभाग घेतला.
लहान मुलांसाठी लिंबू-चमचा स्पर्धेचे, तर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसाठी विविध मनोरंजक खेळ घेतले. सेंटरचे संस्थापक डॉ. अक्षय, सहसंस्थापिका डॉ. अमृता यांनी रुग्णालयाच्या यशस्वी वाटचालीमध्ये सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य तसेच रुग्णांनी दाखवलेला विश्वास मोलाचा ठरल्याचे सांगितले. ‘कॅन्सरमुक्त कोल्हापूर’ हे ब्रीद घेऊन रुग्णांना योग्य वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने क्युरालाईफ कॅन्सर सेंटर महत्त्वाची भूमिका बजावत आहे. तसेच कॅन्सर उपचारांसाठी मुंबई-पुण्यासारख्या शहरांत जाण्यापूर्वी अनेक रुग्ण क्युरालाईफ कॅन्सर सेंटरला भेट देत असल्याचेही डॉ. अक्षय यांनी सांगितले. कर्करोगतज्ज्ञ डॉ. अक्षय शिवछंद, डॉ. अमृता शिवछंद, डॉ. हर्षवर्धन पोखरकर, डॉ. श्रीकांत उमराणी, डॉ. हर्षल भोई आणि डॉ. सुप्रिया जैन यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. गौरी गुणे यांनी सूत्रसंचालन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.