कोवाडला बिमा ग्राम पुरस्कार प्रदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोवाडला बिमा ग्राम पुरस्कार प्रदान
कोवाडला बिमा ग्राम पुरस्कार प्रदान

कोवाडला बिमा ग्राम पुरस्कार प्रदान

sakal_logo
By

00914
कोवाड ः येथील ग्रामपंचायतीला बिमा ग्राम पुरस्कार वितरण विनायक गायतोंडे यांनी केले. दयानंद पाटील, अरुण उबाळे, कल्लापा भोगण उपस्थित होते.
---------
कोवाडला बिमा ग्राम पुरस्कार प्रदान
कोवाड ः भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या गडहिंग्लज शाखेकडून कोवाड ग्रामपंचायतीला बिमा ग्राम पुरस्कार प्रदान केला. एलआयसी वरिष्ठ शाखाधिकारी विनायक गायतोंडे यांच्याहस्ते सरपंच अनिता भोगण यांच्याकडे पुरस्कारांतर्गत एक लाखाच्या धनादेशाचे वितरण केले. जिल्हा परिषद माजी सदस्य कल्लापा भोगण, विकास अधिकारी अरुण उबाळे उपस्थित होते. बिमा ग्रामसाठी सातत्याने प्रयत्न करणारे विमा सल्लागार दयानंद पाटील, विकास अधिकारी अरुण ऊबाळे यांचा ग्रामपंचायतीतर्फे सत्कार केला. विनायक गायतोंडे यांनी मनोगत व्यक्त केले. पुंडलिक जाधव, उत्तम मुळीक, कल्लापा वांद्रे, रामचंद्र व्हन्याळकर, दिपक वांद्रे, आप्पा जाधव आदी उपस्थित होते. ग्रामविकास अधिकारी जी. एल. पाटील यांनी आभार मानले.