संकल्पनात्मक शिक्षणाची कास धरा

संकल्पनात्मक शिक्षणाची कास धरा

01038
कोवाड ः येथील कला महाविद्यालयातील कार्यक्रमात शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांनी मार्गदर्शन केले. डॉ. ए. एस. जांभळे, प्रा. एन. एस. पाटील, एम. व्ही. पाटील उपस्थित होते.
------------
संकल्पनात्मक शिक्षणाची कास धरा
डॉ. पी. एस. पाटील; कला महाविद्यालयात पारितोषिक वितरण
कोवाड, ता. २१ ः वेगवेगळ्या आव्हानांना सामोरे जाताना व कृतिशील शिक्षणाकडे वळताना विद्यार्थ्यांनी संकल्पनात्मक शिक्षणाची कास धरावी. सुप्त कौशल्य गुणांचा शोध घेऊन त्यांचा विकास करण्यावर भर द्यावा. विपरीत परिस्थितीतही विद्यार्थ्यांनी स्वतःला सिद्ध करण्याचे कौशल्य आत्मसात करण्यासाठी संशोधनात्मक वृत्ती जोपासावी, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे प्र. कुलगुरु डॉ. पी. एस. पाटील यांनी केले.
येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. ए. एस. जांभळे होते. माजी राज्यमंत्री भरमूआण्णा पाटील, प्रा. एन. एस. पाटील, एम. व्ही. पाटील उपस्थित होते.
विविध स्पर्धा व परीक्षांतून यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा डॉ. पाटील यांच्याहस्ते गौरव केला. चंदगडच्या मातीत अनेक नामवंत व्यक्ती घडल्या आहेत. येथील विद्यार्थ्यांकडे गुणात्मकता असल्याने त्याला दिशा देण्याची काळाची गरज असल्याचे सांगताना डॉ. पाटील म्हणाले, ‘जागतिक पातळीचा विचार करताना विद्यार्थ्यांनी विचारांची प्रगल्भता वाढवली पाहिजे. करिअर निवडताना कोणाच्या सांगण्यावरुन करिअर निवडू नका. स्वतःचा निर्णय स्वतः घ्यावा. तुम्ही नकारात्मक विचार बाजूला ठेवता त्यावेळेस तुमची यशाकडे वाटचाल होत असते. त्यासाठी विविध आव्हानांना तोंड देताना विद्यार्थ्यांनी यश प्राप्तीसाठी वेळेचे नियोजन काटेकोरपणे केले पाहिजे.’
माजी राज्यमंत्री भरमू पाटील म्हणाले, ‘विद्यार्थ्यांनी करिअरची निवड करताना व्यापक दृष्टीकोन ठेवला पाहिजे. विद्यार्थ्यांनी कौशल्ये व उपलब्ध अभ्यासक्रम आत्मसात करुन घेतले पाहिजे.’
प्राचार्य डॉ. एम. एस. पवार यांनी प्रास्ताविकात महाविद्यालयाच्या कामकाजाचा आढावा घेतला. डॉ. ए. एस. जांभळे व प्रा. एन. एस. पाटील, गोविंद पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. ए. के. कांबळे व सुनिता कांबळे यांनी सुत्रसंचालन केले. डॉ. व्ही. के. दळवी यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com