Elephant
Elephantesakal

कुदनूर भागात टस्कर हत्तीचा धुमाकूळ; ऊस, कडधान्यांचं मोठं नुकसान, हत्तीला पाहण्यासाठी उसळली गर्दी

हत्तीला पाहण्यासाठी लोकांची गर्दी उसळली होती. दिवसभर वनविभागाचे पथक हत्तीच्या मागावर होते.
Summary

कुदनूर येथे आलेला हत्ती मासेवाडी येथील आहे. त्याला ‘चाळोबा गणेश’ म्हणून लोक ओळखतात.

कोवाड : येथील कर्यात भागात तब्बल बारा वर्षांनंतर टस्कर हत्तीचे (Elephant) दर्शन झाले. किटवाड, कुदनूर, कालकुंद्री व चिंचणे भागातील शेतात दिवसभर हत्तीने धुडगूस घातला. ठिकठिकाणी ऊस व कडधान्य पिकांचे मोठे नुकसान केले. हत्ती आल्यामुळे शेतात काम करणाऱ्यांची एकच पळापळ झाली.

हत्तीला पाहण्यासाठी लोकांची गर्दी उसळली होती. दिवसभर वनविभागाचे पथक हत्तीच्या मागावर होते. सायंकाळी हत्ती आल्या मार्गानेच मार्गस्थ झाल्याने शेतकऱ्यांनी (Farmers) नि:श्‍वास सोडला. कुनदूर येथील मारुती मुतकेकर यांच्या शेतात शनिवारी पहाटे हत्तीचे दर्शन झाले. तसा हा हत्ती गडहिंग्लज (Gadhinglaj) तालुक्यातील मासेवाडीत होता. शुक्रवारी रात्री तो घटप्रभा नदी पार करून कमलवाडीत आला. तेथून तो दुंडगे मार्गे कुदनूर येथे आला होता.

Elephant
Khasbag Kesari : भारत मदनेला अवघ्या 2 मिनिटांत अस्मान दाखवत पृथ्वीराज पाटील ठरला 'खासबाग केसरी'

हत्ती आल्याची माहिती मिळताच कुदनूर, किटवाड, कालकुंद्री ग्रामस्थांना ग्रामपंचायतीतून सावधगिरीच्या सूचना दिल्या होत्या. मसूर काढणीसाठी वा ऊस तोडणीसाठी शेतात गेलेल्या शेतकऱ्यांची हत्तीमुळे धावपळ सुरू झाली. सकाळी सात वाजता हत्ती किटवाड धरणावर गेला. त्याठिकाणी नरसू तेऊरवाडकर यांच्या उसाच्या शेतात अर्धा तास थांबला. त्यानंतर त्याने खन्नेटी गावाकडे मोर्चा वळविला. नऊ वाजता पाटणे वनपरिक्षेत्राचे अधिकारी प्रशांत आवळे यांच्या नेतृत्वाखाली वनपाल जे. आर. डिसोझा, एन. एम. धामणकर, आर. बी. पाटील यांच्यासह पथकाने हत्तीला हुसकावून लावण्याचे काम केले.

Elephant
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याची शपथ घेतली होती, त्याप्रमाणं 10 टक्के आरक्षण दिलं - एकनाथ शिंदे

दुपारी तीन वाजता हत्ती कुदनूर गावाच्या दिशेने गावडे नावाच्या शेतात आला. अगदी कुदनूरच्या गावाला लागून हत्ती घरांजवळून दुंडगे रस्त्यावर आला. चार वाजता चिंचणे गावाच्या दिशेने तो मार्गस्थ झाला. दिवसभर हत्तीने चकवा देत शेती पिकांतून धुडगूस घातली. मसूर, वाटाणे, मोहरी, वाटाणे व ऊस पिकाचे नुकसान केले. सायंकाळी उशिरापर्यंत वनविभागाचे कर्मचारी हत्तीला आलेल्या मार्गाने घालविण्यासाठी प्रयत्न करत होते.

तपापूर्वीच्या आठवणी जाग्या

चंदगड तालुक्यात पहिला हत्ती होसूर येथे आला होता. त्यावेळी लीला पाटील या शेतकरी महिलेला जीव गमवावा लागला. त्यानंतर बारा वर्षांपूर्वी चिंचणे जंगलात दोन हत्ती आले होते. या दोन्ही हत्तींनी कुदनूर व कालकुंद्री परिसरात हैदोस घातला होता. आज पुन्हा हत्तीचे या भागात आगमन झाल्याने जुन्या आठवणी लोकांच्या मनात जाग्या झाल्या होत्या.

Elephant
Justice Bhushan Gavai : कोल्हापूर खंडपीठासाठी नेहमीच प्रयत्नशील; सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींची ग्वाही

हा तर ‘चाळोबा गणेश’

कुदनूर येथे आलेला हत्ती मासेवाडी येथील आहे. त्याला ‘चाळोबा गणेश’ म्हणून लोक ओळखतात. शुक्रवारी रात्री ज्या मार्गाने आला होता, त्याच मार्गाने तो शनिवारी पुन्हा मार्गस्थ झाला आहे. हत्तीच्या मागावर आम्ही आहोत. रविवारी सकाळी प्रत्यक्ष हत्ती कुठल्या भागात आहे, ते समजेल; पण तोपर्यंत लोकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन पाटणे येथील वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत आवळे यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com