ओलम कारखान्याकडून ऊस बिले जमा ः भरत कुंडल

ओलम कारखान्याकडून ऊस बिले जमा ः भरत कुंडल

02022
ओलम कारखान्याकडून
ऊस बिले जमा : भरत कुंडल
सकाळ वृत्तसेवा
कोवाड, ता. २९ : राजगोळी खुर्द (ता. चंदगड) येथील ओलम (हेमरस) साखर कारखान्याने चालू गळीत हंगामातील ऊस बिले प्रतिटन ३१४४ दराप्रमाणे ऊस उत्पादकांच्या बँक खात्यावर जमा केली आहेत. नवीन दरानुसार तोडणी व वाहतुकीची बिले, कमिशन, डिपॉझिट बिले वाहतुकदारांच्या बँक खात्यावर जमा केल्याची माहिती कारखान्याचे बिझनेस हेड भरत कुंडल यांनी दिली.
ओलम साखर कारखान्याने जिल्ह्यात सर्वांत प्रथम गळीत हंगामातील सर्व ऊस बिले व वाहतूकदारांची बिले अदा करून शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला आहे. सध्या लग्नसराई, यात्रा, जत्रा सुरू असल्याने व खत खरेदीसाठी लोकांना पैशांची गरज भासते. त्यामुळे कारखाना प्रशासनाने गळीत हंगामाची सांगता होताच तत्काळ शेतकऱ्यांची बिले अदा करून शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळल्याचे कुंडल यांनी सांगितले. चालू गळीत हंगामात ५५०च्या वर तोडणी व वाहतूक यंत्रणा कार्यान्वित होती. त्यामुळे ६ लाख ४१ हजार १११ टन उसाचे गाळप झाले. शेतकरी, कामगार व तोडणी मजूर व वाहतूकदारांच्या प्रयत्नामुळे कारखान्याचे ऊस गाळपाचे निर्धारित उद्दिष्ट पूर्ण झाले. पुढील गळीत हंगामासाठी ऊस नोंद व वाहतूक करार करून घेण्याचे काम सुरू झाले आहे. कारखान्याच्या चंदगड, आजरा, गडहिंग्लज व सीमा भागातील शेती कार्यालयातून ऊस नोंदीचे काम सुरू आहे. ३ मेपासून वाहतूक करार केले जाणार असल्याने वाहतूकदारांनी जवळच्या शेती कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कुंडल यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com