तेऊरवाडीत १२ कृषीपंपांच्या केबलची चोरी

तेऊरवाडीत १२ कृषीपंपांच्या केबलची चोरी

02042
कोवाड : चोरट्यांनी चोरी केलेली केबल अशी जाळून त्यातील धातूची तार लंपास केली आहे.
-----------
तेऊरवाडीत १२ कृषीपंपांच्या केबलची चोरी
लाखो रुपयांचे नुकसान : पोलिसांनी बंदोबस्त करण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
कोवाड, ता. १० : तेऊरवाडी (ता. चंदगड) येथील १२ शेतकऱ्यांच्या निट्टूर पाझर तलावावरील कृषीपंपांच्या केबल चोरीला गेल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. चोरट्यांनी केबल काढून शेजारील ओढ्यात जाळून त्यातील धातूची तार काढून घेतल्याचे शेतकऱ्यांच्या निदर्शनाला आले. याबाबत शेतकऱ्यांनी कोवाड पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. केबल चोरीमुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वारंवार केबल चोरीच्या घटना घडत असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. पोलिसांनी तत्काळ चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
परिसरात तीन महिन्यांत केबल चोरीच्या मोठ्या प्रमाणावर घटना घडत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. केबलची किंमत जास्त असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. याची गांभीर्याने पोलिसांनी दखल घेण्याची गरज आहे. निट्टूर पाझर तलावावरील तेऊरवाडी येथील ब्रम्हदेव पाणी पुरवठा संस्था, प्रकाश दळवी, ब्रम्हानंद बुच्चे, भरमू पाटील, नंदकुमार पाटील, नारायण बुच्चे, परशराम गुडाजी, नारायण पाटील, कृष्णा पाटील, ज्ञानेश्वर पाटील, पुंडलिक पाटील, शंकर पाटील या १२ शेतकऱ्यांच्या केबल चोरीला गेल्या आहेत. केबल नसल्याने या शेतकऱ्यांचे कृषीपंप बंद आहेत. सध्या पिकांना पाण्याची गरज आहे. तलावातील पाणी उपशावरही मर्यादा आहेत. अशा परिस्थितीत केबल चोरीला गेल्याने शेतकरी हताश झाले आहेत. केबल चोरीचे रॅकेट असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पोलिसांनी केबल चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com