सकाळची कोल्हापूर बस सुस्थितीत हवी

सकाळची कोल्हापूर बस सुस्थितीत हवी

सकाळची कोल्हापूर बस सुस्थितीत हवी
प्रवाशांतून मागणी : सततच्या नादुरुस्तीमुळे गैरसोय
सकाळ वृत्तसेवा
कोवाड, ता. ५ : येथून दररोज सकाळी सव्वा सहा वाजता कोल्हापूरला जाणारी एसटी बस नियमित व सुस्थितीत असावी, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.
लांब पल्ल्याची ही बस आहे. पण, सतत नादुरुस्तीचा प्रश्न उद्‍भवत असल्याने प्रवाशांना त्रासदायक झाले आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असल्याने याची आगारप्रमुखांनी तत्काळ दखल घेऊन या मार्गावर सुस्थितीत असणारीच बस वेळेवर सोडावी, अशी मागणी होत आहे. कोवाड परिसरातील प्रवाशांची अडचण लक्षात घेऊन चंदगड आगाराने कोवाड ते कोल्हापूर ही मुक्कामाची बस सुरू केली आहे. अनेक वर्षांपासून ही बस नियमित सुरू असल्याने कोल्हापूरला जाणारे अनेक प्रवासी या बसच्या भरोशावर असतात. सकाळी सव्वा सहा वाजता कोवाडहून ही बस कागणी, कुदनूरमार्गे कर्नाटक हद्दीतून कोल्हापूरला जाते.
कोल्हापूर हे जिल्ह्याचे ठिकाण असल्याने वेगवेगळ्या शासकीय कामांसाठी तसेच व्यापार, उद्योग, आरोग्य व शैक्षणिक कामांसाठी ही अनेक नागरिक व विद्यार्थीही ये-जा करतात. कोवाड परिसरातील जवळपास २० खेड्यांतील नागरिकांची या बसमुळे चांगली सोय झाली आहे. बस नियमित असल्याने पहाटेपासून प्रवासी बसच्या प्रतीक्षेत असतात. पण, काही वेळा पूर्वकल्पना न देता अचानक बस रद्द करण्याचे प्रकार घडतात. यावेळी प्रवाशांची धावपळ सुरू होते. तांत्रिक अडचणींमुळे बस रद्द केली असेल तर अशावेळी प्रवाशांची पर्यायी व्यवस्था करण्याची गरज असत; परंतु कोणतीही पूर्वकल्पना न देता केवळ बस रद्द केली जात असल्याने प्रवाशांचे हाल होतात. तसेच अलीकडे या मार्गावर पाठविली जाणारी बस ही सुस्थितीत नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. वाटेत बस अचानक नादुरुस्त होण्याचे प्रकार घडत असल्याने प्रवाशांना मनस्ताप होत आहे. लांब पल्ल्याची बस असल्याने ती सुस्थितीत असण्याची गरज आहे. सध्या पावसाळा सुरू होणार असल्याने आगार प्रमुखांनी सुस्थितीतील बस पाठवावी. तसेच बस नियमित सुरू ठेवावी, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.
--------------
कोवाड ते कोल्हापूर ही बस कोवाड भागातील प्रवाशांसाठी महत्त्‍वाची आहे. बसला प्रवाशांची गर्दी असते. त्यामुळे आगार प्रमुखांनी चांगल्या दर्जाची सुस्थितीत असणारी बस पाठवून प्रवाशांची गैरसोय दूर करावी.
- भावकू गुरव, राजगोळी बुद्रुक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com