कोवाड - पंढरपूरला एस . टी . बस सुरु करावी

कोवाड - पंढरपूरला एस . टी . बस सुरु करावी

Published on

कोवाडमार्गे पंढरपूरला
एसटी बस सुरू करावी

कोवाड, ता. १३ ः चंदगड तालुक्यातील कोवाड भागातून पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) कडून महिन्यातून दोन वेळा एसटी बस सुरू करावी, अशी मागणी वारकरी व विठ्ठल भक्तांकडून होत आहे.
पंढरपूरला श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी कोवाड भागासह सीमाभागातील अनेक भाविक जात असतात. पंढरपूरला जाण्यासाठी जवळपास एस.टी.ची सोय नसल्याने भाविक व वारकरी बेळगांव किंवा कोल्हापूरला जाऊन पंढरपूरला जातात. चंदगडमधून कोवाड, दड्डी, चिक्कोडी मार्गे बस सुरू झाली तर भाविकांची चांगली सोय होणार आहे. पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक वर्षापासून येथील वारकऱ्यांची एस.टी.ची मागणी आहे. नूतन आमदार शिवाजी पाटील यांनी वारकरी व भाविकांची गैरसोय ओळखून महामंडळाकडे एसटी बस सुरु करण्यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी होत आहे. चंदगड तालुक्यात वारकरी व भक्तांची संख्या जास्त आहे. कोवाड, माणगांव, दाटे येथील पारायण सोहळ्याना होणाऱ्या गर्दीने ते अधोरेखित होते. सीमाभागातील उचगांव, बसुर्ते, बेकिनकेरे, अतिवाड, हंदिगनूर, कुरीहाळ सीमाभागातील कर्नाटक हद्दीवरील गावांतूनही भक्तांची संख्या जास्त आहे. सतत वर्षभर भाविक पंढरपूरला ये-जा करत असतात. एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी वारकऱ्यांच्या मागणीचा विचार करून एस. टी. बस सुरू करावी,अशी मागणी होत आहे.
---------------
कोवाड व माणगांव परिसरातून मोठ्या संख्येने भाविक प्रत्येक महिन्याला पंढरपूरला जात असतात. येथील भाविकांनी पंढरपूरला घरे बांधली आहेत. एसटी महामंडळाने बसची व्यवस्था करून भाविकांची गैरसोय दूर करावी.
- पी. एस. भोगण (वारकरी, कोवाड)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com