कोवाड - लक्ष्मीदेवी उत्सव

कोवाड - लक्ष्मीदेवी उत्सव
Published on

02651
श्री महालक्ष्मी देवीची
माणगांवला मिरवणूक
कोवाड, ता. २४ ः माणगांव (ता. चंदगड) येथे श्री महालक्ष्मी देवीची ओटी भरण्याचा कार्यक्रम उत्साहात झाला.
१९४५ च्या यात्रा उत्सव स्थापनेपासून लक्ष्मी देवीच्या ओटी भरण्याच्या कार्यक्रमाला सुरवात झाली. आतापर्यंत पाचवेळा हा कार्यक्रम झाला. तीन दिवस चाललेल्या या उत्सवाची श्री महालक्ष्मी देवीच्या मिरवणुकीने सुरवात झाली. मिरवणुकीत भंडाऱ्याची उधळण व लक्ष्मीचा जयजयकार करत भाविक सहभागी झाले होते. फुलांनी सजविलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीत लक्ष्मीची देवीची मूर्ती ठेवली होती. मिरवणूक धनगरी ढोल, कैताळ, हालगी व भजनाच्या निनादात बाजारपेठेतून निघाली. दुपारी १२ वाजता मंदिरात महालक्ष्मीची प्रतिष्ठापणा केली. पंचक्रोशीतून माहेरवासियांसह भाविकांनी पारंपारिक वेशभूषा परिधान करुन लक्ष्मी देवीचे दर्शन घेत ओटी भरली. सायंकाळी घरोघरी पुरणपोळीचा बेत असल्याने पै-पाहुणे व नातेवाईकांची रेलचेल दिसून आली. रात्री गाथा महाराष्ट्राची सांस्कृतिक कार्यक्रम झाला. ग्रामपंचायत व श्री महालक्ष्मी देवस्थान कमिटीने नेटके नियोजन केले होते. सरपंच रेणुका नरी, उपसरपंच बाबू दुकळे, ग्रामविकास अधिकारी श्रीधर भोगण यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचयात सदस्य, यात्रा कमिटी सदस्य, मंडळांचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी उत्सव पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले. माणगांव ग्रुप ग्रामपंचायतींतर्गत माणगांव, लाकूरवाडी, मलगड, हुंबरवाडी, माणगांववाडी या गावांतील भक्तांचा सहभाग होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com