

लक्ष्मीच्या मिरवणुकीने
कोवाड भक्तिमय
कोवाड, ता. ९ : येथील लक्ष्मी गल्लीतील श्री लक्ष्मी देवी मंदिराच्या वास्तूशांत सोहळ्यानिमित्त काढलेल्या देवीच्या भव्य मिरवणुकीने परिसर भक्तिमय झाला. सकाळी दहा वाजता सरकारांचा वाडा व राम मंदिरापासून मिरवणुकीस प्रारंभ झाला.
आकर्षक फुलांनी सजविलेल्या ट्रॅक्टरमध्ये विराजमान झालेल्या लक्ष्मी देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. ढोल-ताशे, सनई-चौघडे, टाळ-मृदंग, लेझीम पथकाच्या तालावर तरुणांनी भंडाऱ्याची उधळण करत नृत्य सादर केले. रस्त्यांवरील रंगीबेरंगी रांगोळ्या, घरोघरी फुलांचा वर्षाव आणि जयघोषामुळे वातावरण चैतन्यमय झाले होते. विविध गल्लींतून मार्गक्रमण करत मिरवणुकीची सांगता सायंकाळी मंदिराजवळ झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.