कळंबा तुरुंगाधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कळंबा तुरुंगाधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
कळंबा तुरुंगाधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

कळंबा तुरुंगाधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

sakal_logo
By

कळंबा तुरुंगाधिकाऱ्यावर गुन्हा
कोल्हापूर, ता. १० : लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार पीडित महिलेने कळंबा कारागृहातील तुरुंगाधिकाऱ्याविरोधात जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी संशयित तुरुंगाधिकारी योगेश भास्कर जाधव (रा. मध्यवर्ती कारागृह, ऑफिसर क्वॉर्टर्स, कळंबा) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः संशयित जाधव कळंबा कारागृहातील श्रेणी एक या पदावर कार्यरत आहेत. त्याने पीडितेस लग्नाचे आमिष दाखवून डिसेंबर २०२१ ते ९ जानेवारी २०२३ दरम्यानच्या कालावधीत अत्याचार केले. दोघांत वाद झाल्यानंतर संशयिताने सोमवारी पीडितेस जातिवाचक शिवीगाळ करून मारहाण केली. जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. तशी फिर्याद पीडितेने जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी लैंगिक अत्याचार, मारहाणसह अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंद केला आहे. पोलिस उपनिरीक्षक प्रियंका वाकळे तपास करत आहेत.