प्रॅक्टिस चा विजय  तर फुलेवाडी - वाघाची तालीम बरोबरीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रॅक्टिस चा विजय  तर फुलेवाडी - वाघाची तालीम बरोबरीत
प्रॅक्टिस चा विजय  तर फुलेवाडी - वाघाची तालीम बरोबरीत

प्रॅक्टिस चा विजय  तर फुलेवाडी - वाघाची तालीम बरोबरीत

sakal_logo
By

लोगो - श्रीमंत शाहू छत्रपती फुटबॉल लीग
‘प्रॅक्टिस’चा विजय, फुलेवाडी-वाघाची तालीम बरोबरीत 
कोल्हापूर, ता. २८ : प्रॅक्टिस फुटबॉल क्लब ने श्री शिवाजी तरुण मंडळ वर १ - ० ने विजय मिळवत महत्त्‍वपूर्ण दोन गुणांची कमाई केली, तर फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ विरुद्ध उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम यांच्यातील सामना गोल शून्य बरोबरीत राहिला. श्रीमंत शाहू छत्रपती फुटबॉल लीग स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियम येथे सुरू आहे.
प्रॅक्टिस विरुद्ध मंडळ यांच्यातील सामना अटीतटीचा ठरला. सामान्यांच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघानी आक्रमक खेळ केला. पूर्वार्धात ज्युलियस ट्रो याने ३५ व्या मिनिटाला हेडद्वारे गोल नोंदवत सामन्यात १ - ० ने आघाडी घेतली. यानंतर मंडळ ने आक्रमक चाली रचल्या मात्र यश आले नाही. उत्तरार्धात मंडळ संघाने आक्रमणे वाढवत गोलजाळी भेदण्याचा प्रयत्न केला मात्र यश आले नाही. काही संधी थोडक्यात वाया गेल्या. अखेरपर्यंत १ - ० हिच अगदी कायम राहत प्रॅक्टिस संघाने सामना जिंकला. दरम्यान, मैदानावरील गैरवर्तनामुळे प्रॅक्टिसचा राहुल पाटील व मंडळचा संकेत साळोखे यांना रेड कार्ड देण्यात आले. फुलेवाडी विरुद्ध वाघाची तालीम यांच्यातील सामना बरोबरीचा राहिला. दोन्ही संघांकडून होणारे प्रयत्न सफल झाले नाही. संपूर्ण सामना संथ गतीने राहिला. अखेरपर्यंत दोन्ही संघाना गोल नोंदवण्यात यश न आल्याने सामना गोल शून्य बरोबरीत राहिला.