रमेश कदम क्रिकेट ॲकॅडमी अंतीम फेरीत

रमेश कदम क्रिकेट ॲकॅडमी अंतीम फेरीत

लोगो- वसंतराव चौगुले ब गट क्रिकेट स्पर्धा

रमेश कदम क्रिकेट
ॲकॅडमी अंतिम फेरीत

कोल्हापूर, ता. २७ : कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित व श्री वसंतराव चौगुले नागरी सहकारी पतसंस्था पुरस्कॄत वसंतराव चौगुले ब गट क्रिकेट स्पर्धेतील आजचा उपांत्य सामना वेद स्पोर्टस् गडहिंग्लज विरूद्ध रमेश कदम किक्रेट ॲकॅडमी यांच्यात झाला. सामन्यात रमेश कदम किक्रेट ॲकॅडमीने ४ विकेटने विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. प्रथम फलदांजी करताना वेद स्पोर्टस् संघाने ३६.१ षटकांत सर्वबाद २३४ धावा केल्या. यामध्ये राम कांबळेने १२१ धावा केल्या. कदम ॲकॅडमीकडून चेतन नार्वेकर व क्षितीज पाटील यांनी प्रत्येकी ४ बळी घेतले. उत्तरादाखल खेळताना कदम ॲकॅडमीने ३२.२ षटकांत ६ बाद २३७ धावा केल्या. यामध्ये मिहीर किल्लेदार ६०, क्षितीज पाटील ५५ धावा केल्या. वेद स्पोर्टस संघाकडून संजय जमदाडे व राम कांबळे यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com