वसंतराव चौगुले ब गट क्रिकेट स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वसंतराव चौगुले ब गट क्रिकेट स्पर्धा
वसंतराव चौगुले ब गट क्रिकेट स्पर्धा

वसंतराव चौगुले ब गट क्रिकेट स्पर्धा

sakal_logo
By

लोगो- वसंतराव चौगुले ब गट क्रिकेट स्पर्धा

शाहू स्पोर्टस्
अंतिम फेरीत
कोल्हापूर, ता. २८ : कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित व श्री वसंतराव चौगुले नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे वसंतराव चौगुले ब गट क्रिकेट स्पर्धेत शाहू स्पोर्टस् संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला. उपांत्य सामन्यात एमएसईबी (महावितरण) संघाला नमवले. प्रथम फलदांजी करताना एमएसईबी (महावितरण) ने १३. ५ षटकांत सर्वबाद फक्त ६५ धावा केल्या यामध्ये सागर कांबळे व प्रशांत भोसले यांनी प्रत्येकी १३ धावा केल्या. शाहू स्पोर्टस् ॲकॅडमीकडून विनायक पाटील व देवेश वराडे यांनी प्रत्येकी ३, मयुर दळवी २, विशाल पाटील व प्रसन्ना पाटील यांनी प्रत्येकी १ बळी घेतला. उत्तरादाखल खेळताना शाहू स्पोर्टस् ॲकॅडमीने ९.१ षटकांत १ बाद ६६ धावा केल्या. यामध्ये विशाल पाटील नाबाद ५४ व संग्राम चव्हाण नाबाद ९ धावा केल्या. महावितरणकडून सतिश पाटीलने १ बळी घेतला.