फुलेवाडीचा शिवाजी मंडळ ला धक्का

फुलेवाडीचा शिवाजी मंडळ ला धक्का

Published on

लोगो- महापालिका फुटबॉल चषक स्पर्धा
-
फोटो- 88857
-

फुलेवाडीचा शिवाजी मंडळाला धक्का 
टायब्रेकरमध्ये ३-१ गोलने विजय; रणवीर खालकर ठरला उत्कृष्ट खेळाडू  

कोल्हापूर, ता. १३ : पूर्णवेळ गोलशून्य बरोबरीत राहिलेल्या सामन्यात टायब्रेकरमध्ये फुलेवाडी फुटबॉल क्लबने श्री शिवाजी तरुण मंडळ संघावर ३-१ गोल फरकाने विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. महापालिका फुटबॉल चषक स्पर्धेतील सामना छत्रपती शाहू स्टेडियमवर झाला.   
नियोजनबद्ध खेळ, सूत्रबद्ध चालींच्या जोरावर फुलेवाडी संघाने शिवाजी तरूण मंडळाच्या संघाला पहिल्याच सामन्यात बाहेरचा रस्ता दाखवला. गतवर्षी सर्वाधिक जेतेपद पटकावणाऱ्या संघाला हा सर्वात मोठा धक्का होता. सामन्याच्या सुरुवातीपासून शिवाजी तरूण मंडळाच्या संघाने आक्रमक चाली रचल्या. मात्र, फुलेवाडीच्या बचाव फळीने गोल जाळीवरील थेट आक्रमणे थोपवली. फुलेवाडी संघाने आक्रमण करत गोलसाठी प्रयत्न केला. यावेळी रोहन मंडलिक याने मारलेला फटका शिवाजी तरूण मंडळाचा गोल रक्षक मयुरेश चौगले याने सूर मारून अडवल्याने शिवाजी तरूण मंडळावरील गोल टळला.  पूर्वार्ध गोल शून्य बरोबरीत राहिला. उत्तरार्धातही मंडळ संघानेच आक्रमण  ठेवले. दरम्यान रोहन आडनाईक याने हेडद्वारे गोल जाळीच्या दिशेने मारलेला चेंडू फुलेवाडीचा गोलरक्षक रणवीर खालकर याने अडवला. पूर्णवेळ सामना गोलशून्य राहून टाय ब्रेकरवर खेळवण्यात आला. रणवीर खालकर उत्कृष्ट खेळाडू ठरला. 

चौकट
असा झाला टाय ब्रेकर  
फुलेवाडी फुटबॉल क्लब*श्री शिवाजी तरुण मंडळ 
अक्षय मंडलिक - गोल*जय कामत   - बाहेर    
संदीप पोवार - बाहेर*रोहन आडनाईक - गोल   
सिद्धेश यादव - गोल*सुयश हांडे - बाहेर                                
अरबाज पेंढारी - बाहेर*योगेश कदम - बाहेर        
रोहित मंडलिक - गोल                                 

चौकट
आजचा सामना 
दिलबहार तालीम मंडळ विरुद्ध झुंजार क्लब

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com