‘पीटीएम’चा विजय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘पीटीएम’चा विजय
‘पीटीएम’चा विजय

‘पीटीएम’चा विजय

sakal_logo
By

लोगो - राजेश चषक फुटबॉल स्पर्धा
91228
कोल्हापूर : राजेश चषक फुटबॉल स्पर्धेत पाटाकडील तालीम विरुद्ध फुलेवाडी यांच्या सामन्यातील क्षण. (मोहन मेस्त्री : सकाळ छायाचित्रसेवा)

‘पीटीएम’चा विजय 
़़़‘फुलेवाडी क्लब’वर टायब्रेकरमध्ये ५-४ गोलने मात 

कोल्हापूर, ता. २४ : संयुक्त जुना बुधवार सेवाभावी संस्थेतर्फे आयोजित केलेल्या राजेश चषक फुटबॉल स्पर्धेत पाटाकडील तालीम मंडळ संघाने फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ संघावर ‘टायब्रेकर’मध्ये ५ - ४ गोल फरकाने विजय मिळवला. 
सुरुवातीपासून आक्रमक खेळणाऱ्या फुलेवाडी संघाने आक्रमक चाली रचल्या. मात्र यश आले नाही. ‘पाटाकडील’कडून बचाव फळीने उत्तम काम केले. थोड्या वेळाने पाटाकडील च्या आघाडी फळीने आक्रमण करत फुलेवाडी संघाच्या गोल जाळीवर आक्रमण केले. मात्र गोलरक्षकाने चाणाक्ष राखण करत गोलरक्षण केले. पूर्वार्ध गोल शून्य बरोबरीत राहिला. उत्तरार्धात देखील पाटाकडील कडून ऋषिकेश मेथे, प्रथमेश हेरेकर, रोहित देसाई, ओंकार मोरे यांनी गोल नोंदवण्याचे प्रयत्न केले. तर फुलेवाडी संघाकडून रोहित मंडलिक, मंगेश दिवसे, आदित्य रोटे यांनी चढाया करून गोल साठी प्रयत्न केले. मात्र सामन्याच्या संपूर्ण वेळेत दोन्ही संघातील खेळाडूंना एकही गोल नोंदवता आला नाही. त्यामुळे हा सामना टाय ब्रेकरमध्ये खेळण्यात आला. फुलेवाडीचा अक्षय मंडलिक लढवय्या खेळाडू, तर ‘पीटीएम’चा प्रथमेश हेरेकर उत्कृष्ट खेळाडू ठरला. 
------------
चौकट
पुन्हा हुर्रे... हुल्लडबाजी 
गेल्या काही सामान्यांपासून बंद असलेली अर्वाच्च शिवीगाळ व हुल्लडबाजीला पुनः सुरुवात झाली. खेळाडूंना उद्देशून शिवीगाळ करणे, मैदानावरील पंचांच्या निर्णयावर आक्षेप नोंदवत बघून घेण्याची भाषा करणे. खेळाडूंवर दबाव निर्माण होण्यासाठी हुर्रे करणे हे प्रकार पुन्हा मैदनाने अनुभवले.     
---------------
असा झाला टाय ब्रेकर 
फुलेवाडी*पाटाकडील 
अक्षय मंडलिक   - गोल*अक्षय मेथे पाटील - गोल 
स्टॅनली   - बाहेर*प्रथमेश हेरेकर  - गोल 
संदीप पोवार   - गोल*व्हिक्टर जॅक्सन   - गोल 
सिद्धेश यादव - गोल*ओंकार जाधव - गोल 
रोहित मंडलिक  - गोल*ओंकार पाटील - गोल 

आजचा सामना 
उत्तरेश्‍वर तालीम विरुद्ध झुंजार क्लब