आपची मागणी

आपची मागणी

Published on

सोमय्यांवर कारवाईची
‘आप’ची मागणी
कोल्हापूर, ता. १८ भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी, अन्यथा महिला आघाडी रस्त्यावर उतरेल, असा इशारा आम आदमी पक्षातर्फे (आप) पत्रकाद्वारे देण्यात आला आहे.
सोमय्या प्रकरणाने भाजपचे खरे रूप जनतेसमोर उघड झाले आहे. सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. त्यांच्यासारख्या बड्या राजकीय नेत्याचा खासगी व्हिडिओ व्हायरल होत आहे, हे भाजपच्या इतर अनेक नेत्यांच्या चरित्राचे ट्रेलर आहे. महिलांचे शोषण करण्यात भाजपचे अनेक नेते उघडे पडत आहेत. सोमय्याविरोधात अनेक तक्रारी येत होत्या. पण, केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता असल्याने गुन्हे नोंदविले जात नव्हते. सोमय्या यांच्यावर पोलिसांनी सोमोटो कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी ‘आप’च्या महिला प्रदेशाध्यक्षा सीमा गुट्टे यांनी पत्रकातून केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.