कसबा बावडा

कसबा बावडा

आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्या जमावाचा चोप
घरावर दगडफेक : कसबा बावड्यात तणावपूर्ण शांतता
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १३ : टिपू सुलतानचा मोबाईल स्टेटस ठेवल्याबद्दल कसबा बावडा येथील तरुणांच्या जमावाने एकाला मारहाण करत त्याच्या घरावर दगडफेक केली. यामुळे कसबा बावडा येथे काही काळ तणाव निर्माण झाला. कसबा बावडा, गोळीबार मैदान येथील फतेली पाणंद येथे रात्री आठ-साडे आठच्या दरम्यान ही घटना घडली. दरम्यान, आक्षेपार्ह स्टेस्टस ठेवणाऱ्या संबंधित तरुणाच्या घरासमोर पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. तर रात्री उशीरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरु होते.
कसबा बावडा येथील एका तरुणाने टिपू सुलतानचे स्टेटस ठेवले होते. हे स्टेटस पाहून संबंधित तरुणाला, तू टिपू सुलतानचे स्टेटस का ठेवलेस अशी विचारणा केली. यावेळी त्या तरुणाने ‘ठेवणार की’ असे उत्तर दिल्यामुळे संतप्त झालेल्या तरुणांच्या गटाने त्या तरुणाला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी हा तरुण आपल्या घराकडे पळत सुटला. घरात गेल्यानंतर बाहेर असणाऱ्या जमावाने त्याच्या घरावर दगडफेक करण्यास सुरुवात केली. काही तरुण घरात घुसले आणि पुन्हा त्याला मारहाण करु लागले. या घटनेची माहिती मिळताच शाहूपुरी पोलिसांनी तत्काळ धाव घेतली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. मात्र तरुणांच्या गटाने रस्त्यावर ठाण मांडत संबंधित तरुणावर अटक करुन त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. पोलिसांनीही त्या तरुणाला तत्काळ ताब्यात घेवून पोलिस ठाण्यात नेले. त्यानंतर रात्री उशीरापर्यंत त्याच्यावर गुन्हा नोंद करण्याचे काम सुरु होते. त्या तरुणाला ताब्यात घेतल्यानंतर जमाव शांत झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com