गैरसमजातून सप्तपर्णी वृक्ष तोडू नका

गैरसमजातून सप्तपर्णी वृक्ष तोडू नका

Published on

गैरसमजातून सप्तपर्णी वृक्ष तोडू नका
डॉ. मधुकर बाचूळकर : त्वचारोग, पोटदुखी, मलेरियावर उपयोगी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ६ : गैरसमजातून सप्तपर्णी वृक्ष तोडू नका, असे आवाहन वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. मधुकर बाचूळकर यांनी केले आहे. त्वचारोग, पोटदुखी, मलेरियावर उपयोगी असल्याने या आयुर्वेदिक वृक्षाची तोड करू नका, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
डॉ. बाचूळकर म्हणाले, ‘‘ऑक्टोबर-नाव्हेंबरमध्ये जेव्हा सप्तपर्णीला बहर येतो. त्याचा पंधरा दिवस सुगंध परिसरात दरवळतो. तो तीव्र असल्यामुळे काही गैरसमज पसरवले जात आहेत. विशेषतः सोशल मीडियावर ते दिसत असून, त्या गैरसमजूतीतून ते तोडण्याची मागणी होऊ लागली आहे. त्याच्या फुलांचा वास उग्र असल्याचा अनुभव नागरिकांना येत आहे. डोकेदुखीसह अन्य आजार होत असल्याचा गैरसमज पसरवला जात आहे. हे चुकीचे आहे. पश्चिम घाटात पुणे, कोल्हापूर, दाजीपूर, राधानगरी, कोकणासह शहरातील शिवाजी विद्यापीठ, रुईकर कॉलनी, पेटाळा, खानविलकर पेट्रोल पंप, नागाळा पार्क परिसरात तो आढळतो. जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिकांनी काळजी घ्यावी.’’
---------------
गैरसमज काय...?
- डोकेदुखी, श्‍वसन विकार, घसा दुखणे, मळमळणे, उलटी होणे, खोकल्याचा त्रास
- वायूमुळे अल्सर व कॅन्सर
- वृक्षावर पक्षी आसरा घेत नाहीत
- जनावरे याचा पाला खात नाहीत- वृक्ष अतिशय घातक वायू सोडतो
- मानवाच्या आरोग्याला हानिकारक
--------------
फायदे असे
- सप्तपर्णी देशी असून आयुर्वेदानुसार त्वचारोग, अग्निमांद्य, अतिसार, पोटविकारावर गुणकारी
- याची साल, पाने, मुळे, चिक औषधात वापर
- भूक वाढते, व्रण व दंतक्षयावर उपयोगी
- डिटॅमाईन व इकायटामॉईन ही अल्कलॉईड असलेली साल यकृत रोगावर उपयोगी
-------------
कोट
वासाची ॲलर्जी असणाऱ्यांनी व दमा रुग्णांनी वृक्षाच्या छायेत थांबू नये. जगातील कोणताही वृक्ष विषारी वायू सोडत नाही. सर्व वृक्ष ऑक्सिजन सोडतात. सप्तपर्णी वृक्षांच्या सहवासात अनेक पक्षी राहतात, घरटी घालतात, फुलपाखरे बागडतात. तो विदेशी नाही. वृक्षाच्या बिया कडू आहेत. त्यातील कडवट द्रव्यामुळे गुरे ती खात नाहीत. तांबडी कणेर, सफरचंदाच्या बिया विषारी असूनही त्याची तोड होत नाही. त्यामुळे सप्तपर्णीबद्दलचे गैरसमज चुकीचे आहेत.
- डॉ. मधुकर बाचूळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com