काटेसावर
14588
कोल्हापूर : कोल्हापूर ते गगनबावडा मार्गावरील शेणेवाडी गावालगत फुललेला काटेसावरीचा वृक्ष.
14587
काटेसावरीला आलेली फुले.
कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर
दुर्मिळ काटेसावर फुलली
दोन रंगांची फुले असणारा एकमेव वृक्ष
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २९ : कोल्हापूर ते गगनबावडा मार्गावरील शेणेवाडी गावालगत काटेसावरीचा दुर्मिळ वृक्ष फुलला आहे. या वृक्षावर लाल व पिवळ्या रंगांची फुले फुलली आहेत. दोन रंगांची फुले देणारा असा वृक्ष निसर्गात इतरत्र कुठेही असण्याची शक्यता नसून, तो जगातील एकमेव वृक्ष असावा, अशी शक्यता वनस्पती तज्ज्ञ डॉ. मधुकर बाचूळकर यांनी व्यक्त केली आहे.
राधानगरी ते दाजीपूर, कराड ते पाटण, कोल्हापूर ते गगनबावडा या रस्त्यांवर लालसावरीचे असंख्य वृक्ष आहेत. वनस्पतीतज्ज्ञ डॉ. सांतापू यांनी १९६६ ला काटेसावरीचा संपूर्ण पिवळ्या रंगाची फुले देणारा वृक्ष पाहिल्याची शास्त्रीय नोंद आहे. डॉ. अलमेडा यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वनक्षेत्रात पाहिले आणि त्यांनी अशा वृक्षांना Bombax ceiba var.lutea असे शास्त्रीय नाव दिले. डॉ. वर्तक व कुंभोजकर यांनी १९८४ मध्ये काटेसावरीचा पांढरी फुले असणारा वृक्ष पाहिल्याची नोंद आहे.
डॉ. बाचूळकर यांनी २००८ मध्ये चंदगड तालुक्यातील हुंदळेवाडी येथे संपूर्ण पिवळ्या रंगाची फुले असणारा काटेसावरचा वृक्ष पाहिला होता. मात्र, त्यांनी गगनबावडा मार्गावर पाहिलेला सावरीचा वृक्ष सर्वांपेक्षा वेगळा होता. त्यानंतर त्यांनी २०१० मध्ये Phytotaxonomy Research Journal मध्ये या दोन रंगी सावर वृक्षाबाबतचा शोध निबंध प्रकाशित केला.
--------------
चौकट
वृक्ष वाचविण्यासाठी प्रयत्न
दरम्यान, गतवर्षापासून कोल्हापूर ते गगनबावडा रस्ता विकास प्रकल्प सुरू झाला आहे. या प्रकल्पात हा वृक्ष तोडला जाण्याची शक्यता आहे. हा वृक्ष अगदी रस्त्याशेजारी आहे. हा महत्त्वाचा अनमोल वृक्ष वाचविण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. मुख्यमंत्री, वनमंत्री यांना पत्रे पाठवली आहेत. त्यांनी याबाबत योग्य, आवश्यक प्रतिसाद दिला आहे. संबंधित अधिकारी यांना सूचना दिल्या आहेत. डॉ. बाचूळकर यांनी वन अधिकारी यांना भेटून सूचना केल्या आहेत. आता कोल्हापूर ते कळेपर्यंत प्रकल्प पूर्ण होत आला आहे. पुढील टप्प्यात पुढची वृक्षतोड सुरू होणार आहे. यासाठी ते वृक्ष वाचविण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.