समाजवादी पार्टी पत्रकार परिषद

समाजवादी पार्टी पत्रकार परिषद

कोल्हापूर, हातकणंगलेत ‘महाविकास’च्या
उमेदवारांना मताधिक्य द्या : प्रताप होगाडे

कोल्हापूर, ता. २५ : कोल्हापूर व हातकणंगले दोन्ही मतदारसंघांतील महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मताधिक्य द्या, असे आवाहन समाजवादी पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष प्रताप होगाडे व प्रदेश महासचिव शिवाजीराव परुळेकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केले. मनुवादी फॅसिझमला देशातून हद्दपार करण्यासाठी पक्ष कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.
होगाडे म्हणाले, ‘दहा वर्षांपासून ‘केंद्र शासन’, ‘भारत सरकार’ हे शब्द गायब झाले आहेत. केवळ ‘मोदी सरकार’ व ‘मोदींची गॅरंटी’ या शब्दांनी कब्जा केला आहे. ही एकाधिकारशाही, हुकूमशाही मनोवृत्तीची, व्यक्तीस्तोम व अंधभक्ती वाढवणारी हिटलर आणि गोबेल्स यांची प्रचारनीती आहे. देशाच्या तिसऱ्या स्वातंत्र्याची लढाई करणे आणि जिंकणे, ही जबाबदारी यासाठी स्थापन झालेल्या देशपातळीवरील इंडिया आघाडीने घेतली आहे. त्यासाठी कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज व हातकणंगलेतील उमेदवार सत्यजित पाटील-सरुडकर यांना विजयी करा. प्रचारासाठी ‘लोकतंत्र बचाव’ ही पुस्तिका तयार केली आहे.’
परुळेकर निवडून येणाऱ्या उमेदवारांनी पंचगंगा नदी पाणी प्रदूषण, शाहू मिल, लक्ष्मी विलास पॅलेस, ऊस उत्पादक शेतकरी, माजी सैनिक यांचे प्रश्‍न सोडवावेत, अशी मागणी केली. पत्रकार परिषदेस मधुकर पाटील, रवी जाधव, जाविद मोमीन, मुकुंद माळी, प्रा. एन. एस. पाटील, प्रा. प्रताप देसाई, उषा कांबळे, रघुनाथ पाटील, अनिल माने, रंगराव नारिंगकर, श्री. कांबळे, प्राजक्ता पंडित व मेघन पंडित उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com