डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्या अमृत महोत्सवीवर्षानिमित्त वर्षभर उपक्रम

डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्या अमृत महोत्सवीवर्षानिमित्त वर्षभर उपक्रम

डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्या
अमृतमहोत्सवानिमित्त वर्षभर उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ८ : ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्या अमृतमहोत्सवीवर्षानिमित्त वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती अमृतमहोत्सव समितीचे अध्यक्ष प्राचार्य जी. पी. माळी व सचिव विश्वास सुतार यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, ‘डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी ११ एप्रिल रोजी वयाच्या पंच्याहत्तरीत प्रवेश केला. त्यांच्या सामाजिक, साहित्यिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्याचा विचार करता त्यांचे अमृतमहोत्सवी वर्ष वैचारिक मंथन आणि विविध समाजोपयोगी उपक्रमाने साजरे करण्यात येत आहे. अमृतमहोत्सव समितीमार्फत वर्षभरात चार कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. २३ जून रोजी एमकेसीएल फाउंडेशनचे चीफ मेंटर डॉ. विवेक सावंत यांचे ‘कृत्रिम बुद्धिमत्तेची क्षितिजे व मानव संभाव्य’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. विनोदकुमार लोहिया अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. पेटाळा येथील राम गणेश गडकरी सभागृहात सायंकाळी चार वाजता व्याख्यान होणार आहे. २२ सप्टेंबर रोजी ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक प्रा. सुरेश द्वादशीवार यांचे ‘चार्वाक ते पानसरे’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. डॉ. जयसिंगराव पवार अध्यक्षस्थानी असतील. यावेळी डॉ. प्रमोद मुनघाटे यांची उपस्थिती राहणार आहे. राम गणेश गडकरी सभागृहात सायंकाळी चार वाजता व्याख्यान होणार आहे. तर २८ डिसेंबर रोजी कोल्हापुरातील शाळांमध्ये ‘लेखक आपल्या भेटीला’ हा उपक्रम क्रिएटिव्ह टीचर्स फोरमने आयोजित केला आहे. त्यादिवशी दुपारी १२ ते ४ या कालावधीत न्यू कॉलेज येथे शिक्षण परिषद होणार आहे. पुढील वर्षी ११ एप्रिल २०२५ रोजी निमंत्रितांच्या उपस्थितीत डॉ. लवटे यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस सोहळा होणार आहे. यावेळी ग्रंथ प्रकाशन व गौरव समारंभ असा संयुक्त कार्यक्रम होणार आहे.’ पत्रकार परिषदेस प्राचार्य प्रभाकर हेरवाडे, प्रा. टी. के. सरगर, प्रा. सी. एम. गायकवाड, भाग्यश्री कासोटे, सागर बगाडे, विजय एकशिंगे, दीपक जगदाळे आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com