आप पत्रकार परिषद

आप पत्रकार परिषद

स्मार्ट मीटरची सक्ती केल्यास आंदोलन
‘आप’तर्फे इशारा; चाळीस हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० : स्मार्ट मीटरच्या जोडणीतून चाळीस हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला जात असल्याचा आरोप करत मीटरची ग्राहकांवर सक्ती केल्यास आम आदमी पक्षातर्फे (आप) राज्यभर रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल, असा इशारा ‘आप’चे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिला. दरम्यान, याविषयी उद्या (ता. ११) महावितरणच्या मुख्य कार्यालयात जाऊन निवेदन देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
देसाई म्हणाले, ‘‘स्मार्ट मीटरच्या माध्यमातून ग्राहकांची पिळवणूक केली जात आहे. हे मीटर बसविण्यासाठी सक्ती करणे चुकीचे आहे. देशातील ग्राहकांवर साडेबारा हजार कोटी रुपये सरकार का लादत आहे. आतापर्यंत एक लाख २५ हजार मीटर बसविण्यात आले आहेत. ग्राहकांना स्मार्ट मीटरद्वारे विद्युत पुरवठा करण्याचे धोरण केंद्र सरकारने आणले आहे. त्याच्या अनुषंगाने राज्यात स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्यासाठी सर्वेक्षण झाले होते. त्याकरिता सुमारे २७ हजार कोटी रुपयांचे टेंडर काढण्यात आले आहे.
विद्युत कायदा, २००३ प्रमाणे मीटर विकत घ्यायचे का नाही, हे ठरवण्याचा अधिकार ग्राहकांचा आहे. त्याचा आर्थिक ताण ग्राहकांवर पडू देणार नाही, असे महावितरणचे म्हणणे आहे. या मीटरचा खर्च छुप्या पद्धतीने बिलातून वसुल करण्याचा डाव महावितरण करत आहे. महावितरणने आधुनिकीकरण केल्यास ग्राहकांचे वीज दर कमी होणे अपेक्षित आहे. उलट, ग्राहकांची लूट करण्यासाठीच स्मार्ट प्रिपेडचा घाट घातला जात आहे.’’ यावेळी जिल्हाध्यक्ष अरुण गळतगे, उत्तम पाटील, सूरज सुर्वे, वसंत पाटील, अभिजित कांबळे, दुष्यन्त माने, समीर लतिफ, प्राजक्ता डाफळे, संजय नलवडे, विजय हेगडे, मयुर भोसले, उमेश वडर, स्वप्नील काळे, लाला बिर्जे उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com