दुचाकी नोंदणी

दुचाकी नोंदणी

Published on

‘आरटीओ’तर्फे दोनचाकी नोंदणी मालिका सोमवारपासून
कोल्हापूर, ता. ९ : प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे नवीन दोन चाकी नोंदणी मालिका MH09-GT १५ जुलैपासून सुरू होत आहे. पसंती क्रमांकाचे अर्ज १५ व १६ जुलैला सकाळी ९ वाजून ४५ मिनिटे ते दुपारी तीन या वेळेत खिडकी क्रमांक १० येथे स्वीकारण्यात येतील, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांनी दिली आहे.
पसंतीचा नोंदणी क्रमांक घेण्यासाठी अर्जासोबत त्या क्रमांकासाठी असलेल्या मूळ रकमेचा डी.डी. जोडणे आवश्यक आहे. धनादेश किंवा पे ऑर्डर अर्जासोबत देऊ नये. पसंती क्रमांकाच्या यादीबाबत त्रुटी आढळल्यास तासात संपर्क साधावा, असे चव्हाण यांनी म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.