कोल्हापूर पुणे वंदे भारत एक्सप्रेस आज धावणार

कोल्हापूर पुणे वंदे भारत एक्सप्रेस आज धावणार
Published on

कोल्हापूरकरांचे स्वप्न
साकार ः धनंजय महाडिक

कोल्हापूर, ता. १५ ः देशाच्या दळणवळणाला गतिमान करणारी आणि अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ कोल्हापूर-पुणे मार्गावर सुरू होत आहे. सोमवारी (ता. १६) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या एक्स्प्रेसला ऑनलाईन पद्धतीने हिरवा झेंडा दाखवतील. या सोहळ्याला केल्हापूर रेल्वेस्थानकावर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमन्ना यांची प्रमुख उपस्थिती आहे, अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली. कोल्हापूरकरांचे वंदे भारत एक्स्प्रेसचे स्वप्न साकार झाले असून, लवकरच ही एक्स्प्रेस मुंबईपर्यंतही जाईल, अशी भावना महाडिक यांनी व्यक्त केली. रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  
खासदार महाडिक म्हणाले, ‘वंदे भारत एक्स्प्रेस अत्यंत आरमदायी, सुरक्षित आणि वातानुकूलित आहे. सोमवार, गुरुवार आणि शनिवारी सकाळी ८ वाजून १५ मिनिटांनी ही एक्स्प्रेस कोल्हापुरातून पुण्याला रवाना होईल. तसेच बुधवार, शुक्रवार आणि रविवार या दिवशी दुपारी २ वाजून १५ मिनिटांनी पुण्यातून कोल्हापूरसाठी निघणार आहे. पुणे-कोल्हापूर अंतरासाठी या एक्स्प्रेसला केवळ पाच तासांचा कालावधी लागेल. मिरज, सांगली, किर्लोस्करवाडी, कराड, सातारा येथे या एक्स्प्रेसचा थांबा आहे. वंदे भारत एक्स्प्रेसला सात डबे असून, यामधून ५३० प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. यासाठी ५७० रुपये प्रतिव्यक्ती तिकीट आहे. तर एक्झिक्युटिव्ह क्लाससाठी ११३५ रुपये तिकीट आहे. सोमवारी (ता. १६) संध्याकाळी ४ वाजता वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला जाईल.’
भाजप जिल्हाध्यक्ष विजय जाधव, माजी नगरसेवक सत्यजित कदम, राहुल चिकोडे, महिला आघाडी अध्यक्ष रुपाराणी निकम उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com