

पिसाळलेल्या कुत्र्याचा
नऊ जणांचा चावा
कोल्हापूर : रेल्वे स्थानक परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने शुक्रवारी नऊ जणांचा चावा घेतला. त्यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. एकाच दिवशी स्थानक परिसरात नऊ जणांना चावा घेतल्याने भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. या परिसरात प्रवाशांची ये-जा सुरू असते. दररोज हजारो प्रवासी रेल्वेतून प्रवास करत असताना भटक्या कुत्र्यांचे टोळके परिसरात फिरत असते. अनेकदा ती थेट प्रवाशांच्या अंगावर धावून जात असल्याचे प्रकार घडले आहेत. आज यातील एका कुत्र्याने तब्बल नऊ जणांना चावा घेतल्याने कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी होऊ लागली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.