टुडे १ ॲंकर

टुडे १ ॲंकर
Published on

टुडे -१ वर लोगो घेणे
--
भाग ४
वन्यजीव- माणूस वर्षानुवर्षे संघर्षाच्या फेऱ्यांत
वन्यजीवांचे भ्रमण मार्ग उद्‌ध्वस्त; सहजीवनाचा पुनर्विचार करून धोरण हवे
ओंकार धर्माधिकारी : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, त. २३ : वन्यजीव आणि माणूस एकेकाळी एकत्र जीवन जगत होते. मात्र आता वन्यजीव मानवी वस्तीत घुसू लागले आहेत. शेतीचे नुकसान करू लागले आहेत. त्यांच्या हल्ल्यात ग्रामस्थ जखमी होत आहेत. याचे मुख्य कारण वन्यजीवांचे भ्रमणमार्ग नष्ट होत आहेत. त्यांच्या प्रजननाच्या जागा सुरक्षित राहिल्या नाहीत. त्यामुळे वन्यजीव शेतांचा आसरा घेतात. त्यातूनच माणूस आणि हा संघर्ष अधिक तीव्र बनला आहे. त्यामुळे आता माणूस आणि वन्यजीव यांच्या सहजीवनाचा पुनर्विचार करून धोरण आखणे काळाची गरज आहे.
जंगल आणि त्या शेजारी असणारी गावे, शेती ही भौगोलिक परिस्थिती नवीन नाही. मात्र पूर्वी वन्यजीवांचा त्रास फारसा होत नव्हता. कारण जंगलात माणसाने कुठेपर्यंत जायचे याचे नियम माणसांनी ठरवले होते. त्यामुळे वन्यजीवही माणसाचा वावर असणाऱ्या क्षेत्रात फारसे येत नव्हते. मात्र विविध विकास प्रकल्प आणि महामार्ग यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली. त्यामुळे वन्यजीवांच्या भ्रमणमार्गाची सलगता तुटली. सुरक्षितपणे एका बाजूने दुसऱ्या बाजूकडे जाण्यासाठी वन्यजीव उसाच्या शेतीचा आसरा घेऊ लागले. कोल्हे, बिबट्या हे ऊस शेतीतच पिलांना जन्म देऊ लागले. जंगल विरळ झाल्याने वाघ अधिक दाट जंगल असणाऱ्या आंबोली, चौकुळ, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही जंगलात गेले आणि स्थिरावले. जिल्ह्यातील वाघ स्थलांतरित झाल्याने गव्यांची संख्या वाढली. त्याचा त्रास शेतकऱ्यांना होऊ लागला आहे. गेल्या वर्षी वन्यजीवांच्या हल्ल्यात गंभीर जखमी होणाऱ्यांची संख्या २० पेक्षा जास्त आहे. तर वर्षभरात वन्यजीवांनी शेतीचे केलेले नुकसान कोट्यवधीच्या घरात आहे. त्या मोबदल्यात वनविभागाकडून मिळणारी रक्कम कमी आहे. त्यामुळे आता जंगलाच्या आसपास असणाऱ्या गावांत वन्यजीवांच्या बद्दल संताप निर्माण होत आहे. जंगलामधील अवाजवी हस्तक्षेपामुळे वन्यजीवांची दिनचर्या, भ्रमण, प्रजनन, सुरक्षा या सगळ्यालाच मर्यादा आल्या आहेत.
--

संवर्धन राखीव
आवश्यक
जिल्ह्यात चार परिसरांना संवर्धन राखीव क्षेत्राचा दर्जा दिला आहे. मात्र यासंबंधीची नियमावली अमलात आणली जात नाही. ही चारही क्षेत्रे वन्यजीवांच्या भ्रमण मार्गातील भाग आहेत. येथे वन्यजीवांना सुरक्षित ठिकाण मिळाले तर त्यांचा आसपासच्या गावांमधील वावर कमी होईल.
---------------------
वाहतुकीला प्रतिबंध
निपाणी- फोंडा महामार्ग दाजीपूर अभयारण्यातून जातो. आंबा-विशाळगड रस्ताही वन्यजीवांच्या भ्रमण मार्गातून जातो. अशा सर्व ठिकाणी संध्याकाळी सहा ते सकाळी सहा या वेळेत वाहतूक बंद ठेवल्यास वन्यजीवांना मार्गस्थ होणे सोपे जाईल.
-
वन्यजीवांचे भ्रमणमार्ग सुरक्षित करणे. त्याचबरोबर जंगलातून जाणाऱ्या रस्त्यांसाठी पर्याय शोधणे. या रस्त्यांचा वन्यजीवांना त्रास होणार नाही. अशा पद्धतीने रस्ते बनवण्याचा विचार करणे. खासगी जागेतील वृक्षतोडीला बंधने आणणे. या उपायोजनांमुळे माणूस आणि वन्यजीव हा संघर्ष कमी होऊ शकतो.
- रमण कुलकर्णी, मानद वनसंरक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com