विद्यार्थ्यांच्या विकासासाठी प्रयत्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यार्थ्यांच्या विकासासाठी प्रयत्न
विद्यार्थ्यांच्या विकासासाठी प्रयत्न

विद्यार्थ्यांच्या विकासासाठी प्रयत्न

sakal_logo
By

03168
अकिवाट ः अनुष्का उळागड्डे व त्यांच्या माता-पित्यांचा सत्कार करताना डी. सी. पाटील. शेजारी मान्यवर.
-------
विद्यार्थ्यांच्या विकासासाठी प्रयत्न
डी. सी. पाटील; अकिवाटला विद्यार्थी, शिक्षकांचा सत्कार
कुरुंदवाड, ता. ९ ः शिष्यवृत्ती परीक्षेत मिळवलेले यश हे विद्यार्थ्यांचे परिश्रम, शिक्षकांची हातोटी व पालकांनी घेतलेले कष्ट यामुळे शक्य झाले आहे. विद्यासागर हायस्कूलमध्ये यापुढेही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन बाहुबली विद्यापीठाचे महामंत्री डी. सी. पाटील यांनी केले.
पाचवी व आठवी शिष्यवृत्ती प्रज्ञावंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. अकिवाट (ता. शिरोळ) येथील विद्यासागर हायस्कूलमधील विद्यार्थिनी अनुष्का उळागड्डे ही शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात दहावी आली. याबरोबरच शाळेतील आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र झाले. विद्यार्थ्यांचा व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा सत्कार विद्यासागर संकुलाच्या प्रांगणात केला. गोमटेश बेडगे, वृषभनाथ मलिकवाडे, कमलाकर चौगुले, पी. ए. मगदूम, पालक विद्यासागर उळागड्डे, अनुष्का उळागड्डे यांनी मनोगत व्यक्त केली. अनिल चौगुले, धनपाल कल्लणावर, पल्लवी पाटील आदी उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक दादासो वाडकर यांनी केले. सूत्रसंचालन जे. एस. गीताजे यांनी केले. आभार डी. ए. सरडे यांनी मानले.