कुरुंदवाडला आश्वासनानंतर आंदोलन मागे

कुरुंदवाडला आश्वासनानंतर आंदोलन मागे

कुरुंदवाडला आश्वासनानंतर आंदोलन मागे
पंचगंगा प्रदूषण, शिरढोण पुलाजवळील कृष्णा योजनेची बंद पाईपलाईन काढण्याची मागणी
कुरुंदवाड, ता. २२ ः पंचगंगा नदी प्रदूषण आणि शिरढोण पुलाजवळील इचलकरंजी कृष्णा-पाणी योजनेच्या बंद असलेल्या पाईपलाईन काढावी आणि पंचगंगा प्रदूषण प्रश्नी वंचित बहुजन आघाडीने मानवी साखळी आंदोलनाचे आयोजन केले होते. परंतू प्रदुषण नियंत्रण मंडळ व इचलकरंजी महानगरपालिकेच्या आश्वासनानंतर मागे घेतले.
प्रदूषित घटकांवर तत्काळ कारवाई करू आणि पाणी कमी झाल्यावर जुनी पाईपलाईन काढून घेऊ, असे लेखी आश्वासन प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि इचलकरंजी महानगरपालिकेने दिल्याने आंदोलन स्थगित केल्याचे जिल्हाध्यक्ष विलास कांबळे यांनी सांगितले. मात्र आश्वासनाची पूर्तता प्रशासनाने न केल्यास पुन्हा आंदोलन छेडणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
पंचगंगा नदीला जलपर्णी ही प्रत्येक वर्षीची समस्या आहे. जलपर्णी प्रवाहित होऊन शिरढोण पुलापर्यंत येते. शिरढोण पुलाजवळ कृष्णा पाणी योजनेच्या पाईपलाईनला येऊन तटते मे अखेरपर्यंत ही जलपर्णी जटील होऊन जाळे निर्माण होते. जूनमध्ये पावसाच्या पाण्याने जलपर्णीचे जाळे सुटत नाही ते पाण्यासोबत पुलाला तटते आणि नदीकाठच्या शेतीत विसावते. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तरी पाईपलाईन महापालिकेने तत्काळ काढून घ्यावी, असे निवेदन जिल्हाध्यक्ष कांबळे यांनी दिले होते.
दरम्यान आज जिल्हाध्यक्ष कांबळे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी पंचगंगा नदीत मानवी विळखा घालण्यासाठी जात असताना इचलकरंजी महापालिकेचे सुभाष देशपांडे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी सचिन हरबट यांनी त्यांना अडवत मागणीची पूर्तता करत आहे, आंदोलन करू नका अशी विनंती केली. मागण्यांची कृती न झाल्यास परत आंदोलन करू, असा इशारा जिल्हाध्यक्ष कांबळे यांनी देत आंदोलन स्थगित करत असल्याचे सांगितले. विश्वास फरांडे, बाबासाहेब शिंगे, संजय सुतार, भीमराव गोंधळी, अर्जुन कांबळे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com