पंचगंगा प्रदुषण सुधारीत बातमी

पंचगंगा प्रदुषण सुधारीत बातमी

Published on

04381

तेरवाड बंधाऱ्यावर फेसाळयुक्त प्रदूषित पाणी
‘स्वाभिमानी’ची तक्रार ः प्रदूषण नियंत्रण अधिकाऱ्यांची भेट

सकाळ वृत्तसेवा

कुरुंदवाड, ता. २४ : तेरवाड (ता. शिरोळ) येथील पंचगंगा नदीवरील बंधाऱ्यावर रसायनमिश्रित पाणी आल्याने पंचगंगेची पुन्हा गटारगंगा झाली असून, काळेकुट्ट पाणी फेसाळत बाहेर पडत आहे. याबाबत स्वाभिमानीचे कार्यकर्ते बंडू पाटील व विश्वास बालिघाटे यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार केल्यानंतर क्षेत्र अधिकारी अंकुश पाटील बंधाऱ्यावर आले. मात्र, प्रदूषण पाहून अक्षरशः अवाक् झाले. तत्काळ वरिष्ठांना अहवाल पाठवतो, असे सांगून पाण्याचे नमुने घेऊन ते निघाले. अधिकारीच प्रदूषणाची तीव्रता पाहून उद्विग्न झाल्याचे पाहायला मिळाले.
तेरवाड बंधाऱ्यापासून ते अब्दुललाटपर्यंत जलपर्णीने पंचगंगा नदीपात्र झाकले गेले आहे. या जलपर्णीच्या आडोशाने प्रदूषित घटकांनी मोठ्या प्रमाणात रासायनिक काळे व अशुद्ध गटारयुक्त पाणी सोडले आहे. नदीतील पाणी प्रोसेसच्या रासायनिक पाण्यासारखा काळपट-हिरवट रंगाचे झाले आहे. पाण्याला फेस आला आहे. परिसरातील शेतीला पाणी दिल्यानंतर शेतातील पाट पाण्याच्या सरीत मीठ फुटले आहे. पंचगंगेवर आधारित गावांनी नळपाणी उपसा बंद केला आहे. दोन दिवसांपासून पंचगंगा नदीला काळेकुट्ट, फेसाळयुक्त पाणी आले असून पाण्याला दुर्गंधी सुटली आहे. यामुळे शेती क्षारपडीचा धोका आहे. शेतीबरोबर आरोग्यही धोक्यात आले आहे.
प्रदूषित पाण्याची पाहणी करून तेरवाड (ता. शिरोळ) येथील पंचगंगेवरील बंधाऱ्यावरून दूषित पाण्याची प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी अंकुश पाटील यांनी पाहणी केली. तेरवाड बंधाऱ्यावर प्रदूषित काळेकुट्ट पाणी, पाण्यावरील तेलाचा तवंग, उग्र वास, बंधाऱ्यातून पाणी बाहेर पडताना तयार झालेला फेस पाहून अधिकारी अवाक्‌ झाले. अशा पाण्यावर लोक जगतात तरी कसे, असा प्रश्न उपस्थित केला. त्यांनी पाण्याचे नमुने घेत पंचनामा करून अहवाल वरिष्ठांना पाठविणार असल्याचे सांगून निघून गेले.
...
पंचगंगेची गटारगंगा किती दिवस राहणार?
लोकसभा निवडणूक प्रचारात सर्वच राजकीय पक्षांकडून पंचगंगा नदी प्रदूषणमुक्तीचे आश्वासन मिळत आहे. त्यातच पंचगंगा प्रदूषण नियंत्रणचा आराखडा नामंजूर झाल्याने पंचगंगा प्रदूषणाचे भिजत घोंगडे पडणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे. पंचगंगेची गटारगंगा किती दिवस राहणार, असा प्रश्न आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com