संतोष कदम खूनप्रकरणी मुख्य संशयिताचा शोध घ्या आदेश.

संतोष कदम खूनप्रकरणी मुख्य संशयिताचा शोध घ्या आदेश.

लोगो
संतोष कदम खून प्रकरण
...
पसार संशयितांना अटक करा
पोलिस महानिरीक्षकांचे सांगली पोलिस प्रमुखांना आदेश
सकाळ वृत्तसेवा
कुरुंदवाड, ता. १२ ः सांगली येथील माहिती अधिकार कार्यकर्ता संतोष कदम यांच्या खून प्रकरणातील तीन महिन्यांपासून पसार असलेले संशयित आरोपी सिद्धार्थ चिपरीकर व शाहरूख शेख यांचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याचे आदेश कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सांगली जिल्हा पोलिस प्रमुखांना दिले आहेत. दोघेही संशयित सांगली जिल्ह्यातील असून त्यांच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत.
सांगली येथील माहिती अधिकार कार्यकर्ता संतोष कदम यांचा ७ फेब्रुवारीला खून करून नांदणी - कुरुंदवाड मार्गावर मोटारीत मृतदेह ठेवून संशयित पळून गेले होते. खुनाची घटना कुरुंदवाड ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आल्याने खुनाचा गुन्हा येथील पोलिस ठाण्यात नोंद होता. सहायक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस यांनी अवघ्या काही तासांतच याप्रकरणी नीतेश वराळे, सूरज जाधव व तुषार जाधव (सर्व रा. सांगली) यांना संशयावरून अटक केली होती.
खूनप्रकरणी जयसिंगपूर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात संशयित नीतेश वराळे, सूरज जाधव, तुषार भिसे आणि पसार सिद्धार्थ चिपरीकर व शाहरूख शेख या पाच जणांविरुद्ध तपासी अधिकारी इचलकरंजीचे पोलिस उपअधीक्षक समीरसिंह साळवे यांनी दोषारोपपत्र दाखल केले आहे.
चिपरीकर व शेख यांनी जयसिंगपूर जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती. यामध्ये चिपरीकर याचा न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला, तर शेखच्या जामीन अर्जावर सुनावणी चालू आहे. मृत जाधव यांच्या कुटुंबाने तपासावर संशय व्यक्त केल्याने खुनाचा तपास पोलिस उपअधीक्षक साळवी यांच्याकडे दिला होता. मात्र, तीन महिने उलटले तरी मुख्य संशयित चिपरीकर व शेख पोलिसांना सापडत नसल्याने तपास यंत्रणेवरच संशय व्यक्त होत आहे. त्यामुळे पसार आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याचे आदेश पोलिस महानिरीक्षक फुलारी यांनी दिले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com