मुस्लीम समाजाच्या विकासासाठी कटीबद्ध

मुस्लीम समाजाच्या विकासासाठी कटीबद्ध

04564
कुरुंदवाड : येथील मुस्लिम सांस्कृतिक सभागृह बांधकाम प्रारंभप्रसंगी उपस्थित आमदार डॉ. राजेंद्र पाटील- यड्रावकर व मान्यवर.
--------------
मुस्लिम समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध
आमदार डॉ. यड्रावकर : कुरुंदवाडमध्ये सभागृह बांधकाम प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
कुरुंदवाड, ता. ८ : मुस्लिम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून, मुस्लिम समाजाचे प्रश्न सोडवणार असल्याचे प्रतिपादन आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी येथे केले. कुरुंदवाड येथील मुस्लिम समाजाच्या सांस्कृतिक सभागृह बांधकाम प्रारंभप्रसंगी ते बोलत होते.
आमदार यड्रावकर म्हणाले, ‘मुस्लिम समाजासाठी शादीखाना, ईदगाह मैदान सुशोभीकरण, हायमॅक्स, दफनभूमीसाठी कंपाऊंड, निवारा शेड, सुशोभीकरणासह समाजाच्या विकासासाठी शिरोळ तालुक्यातील गावागावांत कोट्यवधींचा निधी दिला आहे. कुरुंदवाड शहरात समाजाचा स्वतंत्र हॉल असावा, या दृष्टिकोनातून साडेतीन कोटींचा निधी खर्च करून सुसज्ज अशा हॉलची निर्मिती करण्यात येत आहे. त्याचा फायदा कुरुंदवाड शहराबरोबर आसपासच्या गावातील मुस्लिम समाजाला विविध कार्यक्रम राबवण्यासाठी होईल.’
जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर यांच्या देणगीतून ईदगाह मैदान येथे कूपनलिका मारली. माजी नगराध्यक्ष रावसाहेब पाटील, विजय पाटील, मुख्याधिकारी आशिष चौहान, माजी नगरसेवक अक्षय आलासे, फारुख जमादार, शकील गरगरे, उदय डांगे, मुस्लिम समाज सेंट्रल समितीचे अध्यक्ष इकबाल पटवेगार, आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com