

शिरोळमधून ‘वंचित’कडून
आरिफ पटेल यांना उमेदवारी
कुरुंदवाड : वंचित बहुजन आघाडीच्यावतीने शिरोळ विधानसभा मतदारसंघातून औरवाड (ता. शिरोळ) येथील कार्यकर्ते आरिफ महमदअली पटेल यांना रिंगणात उतरविण्यात आले आहे. वंचित आघाडीच्यावतीने बुधवारी अधिकृत उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली.
पटेल हे वंचित बहुजन आघाडीचे तालुका उपाध्यक्ष आहेत. एकता ट्रकमालक संघटनेचे ते जिल्हाध्यक्ष आहेत. तसेच औरवाड येथील संभाजीराव माने विकास संस्थेचे संचालक आहेत. ‘प्रकाश आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित होऊन आपण काम करीत आहे. विधानसभेसाठी माझी उमेदवारी जाहीर झाली याचा मला आनंद झाला. आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरविणार असल्याची प्रतिक्रिया पटेल यांनी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.