बातमी

बातमी

Published on

04856

आंबेडकरीवादी संघटनांचे
कुरुंदवाडला आंदोलन

कुरुंदवाड, ता. १३ : परभणीत घडलेल्या अवमानाच्या निंदनीय घटनेच्या निषेधार्थ शिरोळ तालुक्यातील विविध आंबेडकरवादी संघटनांनी येथे आंदोलन केले. आंदोलकांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. कुरुंदवाड पोलिस ठाण्याला निवेदन देण्यात आले.
येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे आंबेडकरवादी संघटनांनी एकत्रित येऊन आंदोलन सुरू केले. कार्यकर्त्यांनी घोषणा देत रोष व्यक्त केला. “समाजद्रोही आणि राष्ट्रद्रोही कृती करणाऱ्यांना माफी नाही,” अशा घोषणा देत दोषींना कठोर शिक्षा करण्याचा आग्रह धरला. धम्मपाल ढाले, संजय शिंदे, सतीश भंडारे, शशिकांत तोबरे यांनी दोषींना तत्काळ अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी ठाम मागणी केली. या घटनेमुळे समाजातील शांतता भंग झाली असून, ती समाजाच्या एकोप्याला आणि राष्ट्राच्या मूलभूत तत्त्वांना धक्का देणारी असल्याचे सांगितले. कारवाई झाली नाही तर राज्यव्यापी आंदोलन उभारले जाईल. यावेळी आंदोलकांनी पोलिस ठाण्याला आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. आंदोलनात दिनेश कांबळे, शाहीर आवळे, राजेंद्र देवकाते यांच्यासह आंबेडकरवादी संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com