जिल्हा परिषद शाळांना गतवैभव मिळवून देणार

जिल्हा परिषद शाळांना गतवैभव मिळवून देणार
Published on

जिल्हा परिषद शाळांसाठी ‘शिरोळ पॅटर्न’
कुरुंदवाड पंचायत समितीत निर्धार; पदाधिकारी, अधिकारी गतवैभव मिळवून देणार
अनिल केरीपाळे ः सकाळ वृत्तसेवा
कुरुंदवाड, ता. १९ ः खासगी शाळांचे वाढते प्रस्थ, पालकांचा खासगी शाळांकडे असलेला ओढा व त्यातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या पटसंख्येवर होत असलेला परिणाम या पार्श्वभूमीवर शिरोळ पंचायत समिती पदाधिकारी व अधिकारी जिल्हा परिषद शाळांना गतवैभव आणण्यासाठी झटणार आहेत.
सभापती मिलिंद कुरणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पंचायत समितीचे पदाधिकारी, अधिकारी आणि शिक्षकांच्यात एकत्रित प्रयत्नातून ‘शिरोळ पॅटर्न’यशस्वी करून तालुक्याचा शैक्षणिक आलेख उंचावण्याचा निर्धार केला. गटविकास अधिकारी विजय परीट, गट शिक्षणाधिकारी भारती कोळी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख व शिक्षक संघटना प्रतिनिधी उपस्थित होते.
--
अभ्यास दौऱ्याचे नियोजन
दरम्यान, खासगी कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर) शाळांत भौतिक सुविधांचा विकास करण्यावर भर देण्याचा तसेच आदर्श शाळांच्या कामकाजाचा अभ्यास करण्यासाठी पंचायत समितीमार्फत ‘अभ्यास दौरा’ काढण्याचे ठरविले आहे. उपक्रमशील आणि धडपडी शिक्षकांची एक विशेष समिती स्थापन करणे, ​दिव्यांग विद्यार्थ्यांच्या गरजा ओळखून त्यांच्याकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश दिले. ग्रामपंचायतींमधील १५ व्या वित्त आयोगाच्या निधीचा वापर प्रामुख्याने शाळांच्या विकासासाठी करण्यात येणार आहे.


हे करणार
- १ जून ते १५ जून या कालावधीत विशेष नोंदणी मोहीम
-पंचायत समितीचे सदस्य आणि जिल्हा परिषद सदस्यांचा प्रत्यक्ष सहभाग
-​शिक्षण विभाग आणि महिला बाल कल्याण विभागातर्फे अंगणवाड्यांचे सक्षमीकरण
-पायाभूत स्तरावरच शिक्षणाचा दर्जा सुधारेल याकडे लक्ष देणार
-पहिली आणि दुसरीच्या वर्गांमधील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेकडे विशेष लक्ष
-शिक्षकांसाठी शिष्यवृत्ती आणि विविध कार्यशाळांचे आयोजन करणार
-
शाळांच्या सक्षमीकरणासाठी निर्णय
१)शैक्षणिक गुणवत्तेत वाढीसाठी शिष्यवृत्ती परीक्षेच्या सराव परीक्षांचे नियोजन करणे
२)शासकीय कर्मचाऱ्यांची मुले जिल्हा परिषद शाळेतच दाखल व्हावीत, यासाठी प्रयत्न
३) पंचायत समिती सदस्यांच्या कुटुंबातील मुलेही जिल्हा परिषद शाळेत शिकतील, यासाठी विशेष प्रयत्न करणे
​४)जिल्हा परिषद शाळेत पाल्यांना दाखल करणाऱ्या मातांचा सन्मान करणे
५)गुणवंत शिक्षकांचाही पंचायत समितीमार्फत गौरव करणे
​६)जिल्हा परिषद शाळांच्या उपक्रमांची माहिती पोहोचवण्यासाठी प्रसिद्धी आणि जाहिरातींवर भर देणे

कोट
जिल्हा परिषद शाळा गुणवत्तापूर्ण व सक्षम करणार
मिलिंद कुरणे :
सभापती पंचायत समिती
जिल्हा परिषद शाळांना एकेकाळी उज्ज्वल परंपरा होती. पटसंख्या, गुणवत्ता व प्रचंड क्षमता यामध्ये या शाळा अव्वल होत्या, मात्र खासगी शाळांकडे पालकांचा ओढा वाढला असून, या शाळांना अवकळा आली आहे. हे चित्र बदलता येऊ शकते तितकी क्षमता या शाळा व शिक्षकांमध्ये आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती पदाधिकारी, अधिकारी व शिक्षक यांच्या सामूहिक प्रयत्नातून शिरोळ पॅटर्न म्हणून हे आव्हान आम्ही स्वीकारले आहे व निश्चित त्यादृष्टीने नियोजनपूर्वक काम करू.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com