शिरोळ तालुका वृत्तपत्र विक्रेता पदाधिकारी निवड

शिरोळ तालुका वृत्तपत्र विक्रेता पदाधिकारी निवड
Published on

नागेश गायकवाड 06445
सुकुमार पाटील- 06444

शिरोळ तालुका वृत्तपत्र विक्रेता
संघाच्या अध्यक्षपदी गायकवाड
उपाध्यक्षपदी सुकुमार पाटील यांची निवड
कुरुंदवाड, ता. २० शिरोळ तालुका वृत्तपत्र विक्रेता व एजंट संघ, शिरोळच्या अध्यक्षपदी नागेश गायकवाड (कुरुंदवाड), उपाध्यक्षपदी सुकुमार पाटील (जयसिंगपूर), सचिव धनंजय सावंत (शिरोळ), तर खजिनदारपदी चिदानंद काबळे (शिरोळ) यांची बिनविरोध निवड झाली. निवडीसाठी झालेल्या बैठकीत निवडी झाल्या. रायाप्पा बाळीगिरी (धरणगुती) अध्यक्षस्थानी होते. अध्यक्षपदासाठी गायकवाड यांचे नाव प्रथम सुचविले. यावेळी संजय कांबळे (कनवाड) मनोहर पाटील (कुटवाड), राकेश परीट (शिरटी), धवलकुमार खडके (शिरोळ) बापू कांबळे (आलास), दत्तात्रय कांबळे (तमदलगे), सुरेश गुरव, श्रेणिक सुतार (आकीवाट), बजरंग नंदीकुरळे (घोसरवाड), अरविंद बेनीचीटके (नांदणी), नाभिराज कबाडे (बुबनाळ), अशोक पाटील (टाकळी), गजानन वंट्टे (गणेशवाडी), गणेश सुनके (नृसिंहवाडी), सुहास शिरढोणे (हेरवाड), रमेश चव्हाण (चिपरी), सुभाष इंगळे (कोथळी), अनुराधा सावंत (शिरोळ) आदी उपस्थित होते. राज्य संघटनेचे सभासद होण्यासाठी वृत्तपत्र विक्रेते व एजंट यांनी सहभाग होऊन नोंदणी करून घ्यावी व संघटनेशी संपर्क साधावा, असे आवाहन अध्यक्ष श्री. गायकवाड यांनी सांगितले. मनोहर पाटील यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com